Mapusa Crime News Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime: धक्कादायक! म्हापशात भरदिवसा कॉलेज युवतीला पळवून नेण्याचा प्रयत्न; युवतीचा धाडसी प्रतिकार

म्हापशातील घटना ः डोळ्यांत मारला मिरची स्प्रे; संशयितास अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Crime: म्हापसा येथील एका महाविद्यालयाच्या आवारात येऊन लैंगिक छळ व सतावणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युसूफ शेख यास एका 20 वर्षीय महाविद्यालयीन युवतीने आज चांगलाच धडा शिकवला.

बॉक्सर असलेल्या या युवतीने संशयितावर लाथाबुक्क्यांनी धाडसी प्रतिकार केला. यावेळी या युवतीचा रुद्रावतार पाहून संशयिताने घटनास्थळावरून धूम ठोकली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा त्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

ओळखीचा फायदा घेऊन छळवणूक केल्याच्या रागातून या युवतीने संशयित युसूफ शेख याला चोप देत त्याच्या डोळ्यांत मिरची स्प्रे मारला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून रात्री उशिरा त्याला त्याच्या म्हापशातील घरातून अटक केली.

उपलब्ध माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पीडितेची दुचाकी नादुरुस्त झाल्याने ती दुचाकी घेऊन एका शोरूममध्ये गेली होती. यावेळी संशयिताने तिला मोबाईलवर फोन करून कुठे आहेस असे विचारले असता, तिने आपण शोरूममध्ये असल्याचे सांगितले.

त्यानंतर संशयित शोरूमकडे गेला व त्याने पीडितेला या ठिकाणी दुचाकी दुरुस्तीसाठी जास्त पैसे घेतात असे सांगून तो तिला घेऊन दुसऱ्या ठिकाणी गेला. तेथे मेकॅनिकने गाडीचे काही पार्टस् नवीन घालावे लागतील असे सांगितले.

त्यानंतर गाडीचे पार्टस् आणण्याचा बहाणा करून संशयिताने तिला आपल्या कारमधून एका निर्जनस्थळी नेले व गाडीतच त्याने तिचा लैंगिक छळ केला. या घटनेनंतर संशयिताने पीडितेला पुन्हा घरी आणून सोडले. या प्रकारामुळे पीडितेच्या मनात संशयिताविरुद्ध प्रचंड द्वेष निर्माण झाला होता.

या कथित लैंगिक अत्याचारानंतर पीडितेने संशयिताला आपल्या मोबाईलवरून ब्लॉक केले. मात्र, संशयिताने पीडितेला कॉलेजस्थळी गाठून तिला आपण शुक्रवारी (ता. २८) येऊन भेटणार असल्याचे सांगितले. त्यानुसार, तो आज शुक्रवारी पीडितेचे कॉलेज सुटण्याच्यावेळी घटनास्थळी आला व तिला त्रास देऊ लागला. यावेळी पीडितेने आपल्या बॅगेतील मिरची स्प्रे त्याच्या डोळ्यांत मारला व बेदम चोपही दिला.

लोकांची बघ्याची भूमिका...

ज्यावेळी हा प्रकार घडत होता, तेव्हा रस्त्यावर लोकांची वर्दळ सुरू होती, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी हा प्रकार थांबून पाहात होते.

पीडिता ही प्रशिक्षित बॉक्सर असून तिने संशयिताचा जोरदार प्रतिकार केला. तिने संशयिताचा शर्ट तसेच पाय पकडून त्याला रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु कुणीच तिच्या मदतीला धावून गेले नाही.

हिंदू संघटनांकडून निषेध

या घटनेचा म्हापशातील हिंदू संघटनांनी निषेध व्यक्त केला. तसेच या संघटनांचे पदाधिकारी नारायण राठवड, संजय वालावलकर, हर्षद स्वार, प्रवीण च्यारी व इतरांनी पोलिस निरीक्षक सीताकांत नायक यांची भेट घेत संशयितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda Road Issue: नानोडा रस्ता वाहतुकीस धोकादायक, खोदून ठेवलेला मातीचा भराव ठरतो अपघातास कारण

Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

Goa Beach: पर्यटकांच्या जिवाशी खेळ! गोव्याच्या बीचवर काचेच्या तुकड्यांचा विळखा; प्रसिद्ध यूट्यूबरनं उघड केलं विदारक वास्तव

Goa Accidents: दक्षिणेतील अपघाती मृत्यूत 84 टक्के घट; वाहतूक विभाग उपअधीक्षक प्रभुदेसाई यांची माहिती

Gajalakshmi Rajyog: सुखाचे दिवस सुरू! गजलक्ष्मी राजयोगामुळे 5 राशींचे नशीब चमकणार, मिळणार अमाप संपत्ती आणि मानसन्मान

SCROLL FOR NEXT