Mapusa Accidental Death Dainik Gomantak
गोवा

Mapusa Accidental Death: निष्काळजीपणा भोवला! कामगाराच्या मृत्यूप्रकरणी बाप-लेकीविरोधात गुन्हा नोंद

Mapusa Accidental Death: ही घटना 11 जानेवारी रोजी रात्री 10.30 वा. घडली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Accidental Death: एकतानगर-म्हापसा येथील गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीजवळ एका घराची सेप्टिक टँक उपसण्यासाठी टँकमध्ये उतरलेल्या कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला होता. याप्रकरणी आवश्यक सुरक्षा उपकरणे न पुरवता, निष्काळजीपणे सेप्टिक टँक साफ करण्यास कामगारास टाकीत उतरविल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी बाप-लेकीवर गुन्हा नोंद केला.

म्हापसा पोलिसांनी उर्जन कल्सनार व रेणुका यांच्यावर या संशयित बाप-लेकीविरुद्ध भादंसंच्या कलम 304 (अ) अन्वये गुन्हा नोंद केला. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 11 जानेवारी रोजी रात्री 10.30 वा. घडली होती.

या दुर्घटनेत यमनाप्पा मदार (24, रा. म्हापसा, मूळ-बेळगाव) या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. संशयिताच्या घराचा सेप्टिक टँक साफ करण्याचे काम चार कामगारांनी हाती घेतलेले.

यातील यमनाप्पा हा कामगार टँकमध्ये उतरला होता. मात्र, गुदमरल्याने तो या टाकीत बेशुद्ध होऊन पडला. त्यास अग्निशमन दलाच्या कामगारांनी बाहेर काढले व इस्पितळात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT