Goa Mankurad Mango Dainik Gomantak
गोवा

Goa Mankurad Mango: मानकुराद दीड हजार रुपये डझन, बाजारात आवक वाढली; स्थानिक आंब्यांना अधिक मागणी

Mankurad mango price Goa: राज्यात सध्या बाजारामध्ये आंब्यांची आवक वाढली असून मोठ्या प्रमाणात स्थानिक आंब्यासहित इतर आंबेही बाजारात दाखल झाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात सध्या बाजारामध्ये आंब्यांची आवक वाढली असून मोठ्या प्रमाणात स्थानिक आंब्यासहित इतर आंबेही बाजारात दाखल झाले आहे.

बाजारात मध्यम आकाराचे मानकुराद आंबे हे १५०० रुपये प्रती डझन तर हापूस आंबा ८०० रुपये प्रती डझन दराने विकले जात आहेत. पणजी बाजारात मानकुराद व इतर आंबे हे प्रामुख्याने शिवोली, चोडण, नेरूल या भागातील आहे तर हापूस आंबा हा महाराष्ट्र आणि काही प्रमाणात बेळगावातून आयात केला जात आहे.

या आंब्यासोबत मांगेलाल, पायरी, तोतापूरी, आदी आंबे देखील आणि इतर आंबे देखील बाजारात उपलब्ध असून काही नागरिक आवर्जून त्यांची खरेदी करत आहेत तर परंतु अजूनही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात हे आंब्याचे दर आले नसल्याने काहींजण दर उतरण्याची देखील प्रतीक्षा करत आहेत.

सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक वाढली आहे. येत्या आठवड्यात अजून आवक वाढेल आणि दरांमध्ये घट होण्याची शक्यता असल्याचे विक्रेते सांगतात. सध्या बाजारात आंबा ज्युस, शेक यांची देखील चलती असून काही शीतपेय, शेक देणाऱ्या दुकानांमध्ये आवर्जून हे शेकांना मागणी आहे.

त्यासोबतच बाजारात इतर हंगामी फळे जसे की जांब, फणसाचे गरे, रानमेवा आदी दाखल झाला असून त्यांनाही अतिशय चांगली मागणी आहे. पणजी बाजारात निऱ्याची देखील विक्री होत असून १५० रुपये प्रती बॉटल दराने विकला जात आहे.

आंब्यांचे प्रमाण अत्यल्प

एप्रिल महिना सुरू झाला असला तरी डिचोली बाजारात ‘मानकुराद’ आंब्याची अपेक्षित आवक अद्याप झालेली नाही. परिणामी, सध्या बाजारात ‘मानकुराद’चे दर चांगलेच वाढले असून सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. स्थानिक आंब्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याने बाजारात अजूनही आंब्यांचा दरवळ जाणवत नसल्याचे चित्र आहे.

सध्या डिचोली बाजारात बार्देशमधील शिवोली तसेच पेडणे तालुक्यातील ‘मानकुराद’ दाखल झाला आहे. मात्र, डिचोलीच्या ग्रामीण भागात पिकणाऱ्या स्थानिक ‘मानकुराद’ची आवक अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे बाजारात पुरवठा मर्यादित राहिला असून मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने दर वाढले आहेत.

शुक्रवारी चांगल्या प्रतीचा ‘मानकुराद’ दीड हजार ते सोळाशे रुपये डझन या दराने विकला जात होता, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. दरम्यान, जत्रा काळात धोंड भक्तांकडून ‘मानकुराद’ला विशेष मागणी असते. त्यामुळे जत्रेपूर्वी बाजारात आवक वाढल्यास दर काहीसे कमी होतील, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT