Mankurad Mango in Market Dainik Gomantak
गोवा

Mankurad Mango: दरवर्षीपेक्षा एक महिना आधीच 'मानकुराद'ची बाजारात एंट्री! चव चाखण्यासाठी मोजावे लागणार 'इतके' पैसे...

नुकताच हंगाम सुरू झाल्याने आणि पुरवठाही मर्यादित असल्याने विक्रीची किमत अधिक असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले आहे.

Kavya Powar

Mankurad Mango in Market

गोव्याची ओळख असलेला चविष्ट 'मानकुराद' आंबा आता बाजारपेठेत दाखल झाला असून 5,000 रुपये प्रति डझन या भावाने विकला जात आहे. इतर आंब्यांमध्ये आपलं वेगळेपण जपणारा मानकुराद नेहमीच ज्यादा किमतीने विकला जातो.

नुकताच हंगाम सुरू झाल्याने आणि पुरवठाही मर्यादित असल्याने विक्रीची किमत अधिक असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले आहे.

अखिल गोवा आंबा उत्पादक संघाचे उपाध्यक्ष राजेश धारगळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हंगाम सुरू झाल्यानंतर मानकुराद आंबा जेव्हा पहिल्यांदा बाजारपेठेत दाखल होतो, तेव्हा तो चढया किमतीने विकला जातो. यंदा दरवर्षीच्या तुलनेत एक महिना आधीच मानकुरादने बाजारपेठेत हजेरी लावली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चमध्ये आंबा विक्रीसाठी बाजारात येतो तेव्हा त्याची साधारण किंमत 3,000-3,500 रुपये प्रति डझन असते. मात्र यंदा मानकुराद पणजी, म्हापसा, डिचोली आणि किनारी भागात 5,000 ते 6,000 रुपये डझनने विकला जात आहे.

सध्याची ही किंमत पुढील काही आठवडे अशीच असणार आहे. आताचा हा साठा पुढील काहीच दिवसात संपेल. ही किंमत 7 हजारवर जरी गेली तरीही तो विकला जाईल. कारण मानकुरादशी गोवेकरांच्या भावना जोडलेल्या आहेत.

तसेच इथून परदेशात जाणारे अनेक गोवेकरही मोठ्या प्रमाणात याची खरेदी करत असतात, असे धारगळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT