Workers seriously injured Dainik Gomantak
गोवा

Military Engineering Services Goa: स्लॅब कोसळून कामगार जागीच ठार, मांगोरहील येथील दुर्दैवी घटना

दोघे गंभीर : नौदलाचा हलगर्जीपणा; धोकादायक इमारतीत काम

गोमन्तक डिजिटल टीम

Military Engineering Services Goa मांगोरहील-वरुणापुरी येथे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमधील नौदलाच्या धोकादायक घोषित केलेल्या इमारतीचे काम सुरू ठेवल्याने अचानक स्लॅब कोसळून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर दोन कामगार गंभीररित्या जखमी झाले.

स्लॅब कोसळल्याने मडकई येथील खेमकांत नारायण नाईक (वय 50वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाल्याचे नौदलाच्या जीवंती इस्पितळातील डॉक्टरांनी सांगितले.

या दुर्घटनेत साई महाले (काणकोण) यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली, तर महाराष्ट्रातील बाबासाहेब सांगले यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे.

दोघा जखमींवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. मृत खेमकांत नाईक यांचा मृतदेह मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.

परवानाही नाही

या इमारतीला मुरगाव पालिकेचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना नौदलाकडून या इमारतीत कामकाज सुरू होते. या इमारतींचे कचरा शुल्कही नौदल पालिकेकडे भरत नसल्याची माहिती मुख्याधिकारी जयंत तारी यांनी दिली.

अशा किती इमारती असुरक्षित आहेत, याची माहिती नौदलाकडून मागितली असल्याचे तारी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT