Vande Bharat Express Dainik Gomantak
गोवा

Vande Bharat Express गोवा- मंगळुरू ‘वंदे भारत’ सुरू होणार!

Vande Bharat Express : ऑक्टोबरच्या अखेरीस मंगळुरू आणि गोवा दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचे संकेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिले.

दैनिक गोमन्तक

Vande Bharat Express: ऑक्टोबरच्या अखेरीस मंगळुरू आणि गोवा दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचे संकेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिले. दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी आज नवी दिल्लीत वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीनंतर रेल्वेमंत्र्यांनी आश्वासन दिले.

कर्नाटकच्या किनारपट्टीवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत नसल्याचे कटील यांनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिले. मंगळुरु आणि गोवा दरम्यानच्या किनारपट्टीचा भाग देशाच्या दक्षिणेकडील महत्त्वपूर्ण आहे.

हा प्रदेश निसर्गसौंदर्य, समृद्ध वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरांसाठी ओळखला जातो. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर या भागात कनेक्टिव्हिटी वाढेल आणि आर्थिक आणि पर्यटनाला चालना मिळेल, असेही कटील यांनी सांगितले.

''रेल्वेसेवा सुरु झाल्यानंतर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल. रेल्वे जाळे निर्माण करण्याची सरकारची संकल्पना देखील यामुळे साकार होईल आणि त्याचा आर्थिक फायदा होईल,'' असे कटील यांनी म्हटले आहे. ही रेल्वे सुरू झाल्यास या मार्गावरील रेल्वे प्रवास आधिक सुखकारक होणार आहे.

दरम्यान, मंगळुरू रेल्वे क्षेत्राचा दक्षिण पश्चिम रेल्वेच्या म्हैसूर रेल्वे विभागाच्या प्रशासकीय आणि प्रादेशिक अधिकारक्षेत्रात समावेश करण्याची विनंती खासदार कटील यांनी वैष्णव याना केली होती. मंगळुरू रेल्वे क्षेत्राला दक्षिण रेल्वेने सावत्र वागणूक दिल्याने त्याचा पुरेसा विकास झालेला नाही, असेही कटील म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT