Mandrem Sarpanch Dainik Gomantak
गोवा

Mandrem Sarpanch: मांद्रेतील 'ते' प्रकार तातडीने बंद करा; सरपंचांचे पोलिस निरीक्षकांना पत्र

कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी आणि जुगार- मटका खपवून घेतला जाणार नाही- मुख्यमंत्री

गोमन्तक डिजिटल टीम

Gambling In Mandrem गोव्यात सध्या जुगार, बेकायदेशीर बार यांचे प्रमाण वाढत असून मांद्रे गावात देखील चालणारे जुगाराचे धंदे, भंगारअड्डे व सरकारी वेळेचे बंधन न पाळता रात्री उशीरापर्यन्त सुरु असलेले बार यांमुळे स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. या प्रकारांवर कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी मांद्रे गावंचे सरपंच ॲड. अमित सावंत यांनी पेडणे पोलिस निरीक्षकांना पत्र दिलंय.

Mandrem Sarpanch

बऱ्याच कालावधीपासून हे भंगारअड्डेवाले कोणताच परवाना न घेता बिनधास्तपणे व्यवसाय करीत आहेत. त्याचप्रमाणे परिसरात चालणारे जुगाराचे धंदे, आणि रात्री उशीरा सुरू असलेल्या मद्यालयांवर कायदेशीर कारवाई करून सदर प्रकार बंद करावेत अशा आशयाचे हे पत्र आहे. सदर चाललेले हे बेकायदेशीर प्रकार बंद करून समाजाच्या सुरक्षिततेच्या हिताचे रक्षण करावे असे त्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी आणि जुगार- मटका खपवून घेतला जाणार नाही असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केल्यानंतर पोलिसांनी मटका व जुगारी अड्ड्यावर कारवाई करण्याचे सत्र चालू केले आहे.

नुकतेच राज्यात पोलिसांनी विविध ठिकाणी जुगार अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये एकूण 28 जणांना अटक केली असून लाखो रुपयांसह जुगाराचे साहित्य जप्त केल्याची घटना समोर आलीय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT