Blue Flag Dainik Gomantak
गोवा

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Mandrem Beach Blue Flag Status: उत्तर गोव्यातील मांद्रे आणि दक्षिण गोव्यातील गालगीबाग या दोन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग मानांकन जाहीर झाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: उत्तर गोव्यातील मांद्रे आणि दक्षिण गोव्यातील गालगीबाग या दोन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग मानांकन जाहीर झाले आहे. या मानांकनामुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही किनाऱ्यांवर ब्लू फ्लॅग कधी फडकणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मानांकन जाहीर झाले असले तरी ध्वजारोहणाची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. ब्लू फ्लॅगचा प्रत्यक्ष सन्मान मिळण्यासाठी संबंधित किनाऱ्यांवर आवश्यक तयारी आणि व्यवस्थापनाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत.

स्वच्छता, पर्यटकांची सुरक्षा, पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन आणि आवश्यक पायाभूत सुविधा या निकषांचे सातत्याने पालन करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष ध्वज नेदरलँड्समधून पाठविण्यात येणार असून, ते पर्यटन खात्याकडे सुपूर्द झाल्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे मानांकन जाहीर झाल्यानंतरही प्रत्यक्ष ब्लू फ्लॅग फडकण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

Goa Shipyard Dredger Launch: आंतरराष्ट्रीय जहाजबांधणीत गोवा शिपयार्डची झेप; अत्याधुनिक हायब्रीड ड्रेजरचे यशस्वी लॉन्चिंग

High Tide Waterlogging: खाडीच्या पाण्याचा नेवगीनगरला वेढा; महानगरपालिका कायमस्वरूपी उपाय कधी करणार?

SCROLL FOR NEXT