Two Accused Remanded Ten Days PC In Kamakshi Murder Case Dainik Gomantak
गोवा

Kamakshi Murder Case: कामाक्षी उड्डापनोव खून प्रकरण; दोघा संशयितांना 10 दिवसांची पोलीस कोठडी

तरुणीचा तिच्या प्रियकराने खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Two Accused Remanded Ten Days PC In Kamakshi Murder Case: प्रेमसंबंध तोडले आणि बोलणे बंद केल्याने रागाच्या भरात कळंगुटमधील बुटीकमध्ये सेल्स गर्ल म्हणून काम करणारी कामाक्षी उड्डापनोवा या तरुणीचा तिच्या प्रियकराने खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती.

या प्रकणात पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली होती. दरम्यान दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयितांमध्ये तिचा एक्स प्रियकर फकीर उर्फ प्रकाश चुंचवाड व त्याचा मित्र निरुपदी कडाकक्ल याला अटक करण्यात आली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकाशला त्याचा मित्राने मदत केली होती.

प्रियकराने 30 ऑगस्ट रोजी सकाळी 9च्या सुमारास कामाक्षीचा तिच्याच फ्लॅटवर जाऊन खून केला. तिचा मृतदेह चारचाकीतून आंबोली घाटातील घनदाट जंगलात फेकला. कामाक्षीच्या भावाने पर्वरी पोलिस स्थानकात कामाक्षीचे अपहरण तसेच ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. 

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता कामाक्षीचा मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचे संशयिताने सांगितले. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर सावंतवाडी पोलिस व पर्वरी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला मात्र तिच्या उजवा हात आणि पायाचा काही भाग मिळाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT