arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

Goa Police Bust Vehicle Theft Ring: मायणा कुडतरी पोलिसांनी वाहन चोरीच्या एका मोठ्या प्रकरणाचा छडा लावत दोघांना बेड्या ठोकल्या.

Manish Jadhav

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांनी वाहन चोरीच्या एका मोठ्या प्रकरणाचा छडा लावत दोघांना बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे परिसरात होणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या संशयितांच्या माहितीवरुन पाच चोरीच्या दुचाकीही जप्त केल्या. ही कारवाई भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची आधारे केली.

संशयितांना अटक आणि मुद्देमाल जप्त

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे प्रिन्स उर्फ सावियो फर्नांडिस (वय 35) आणि मायरॉन फर्नांडिस (वय 18) अशी आहेत. पोलिसांनी पीआय अरुण ए. गावस देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन्ही संशयितांच्या माहितीच्या आधारावर चोरीला गेलेली एकूण पाच वाहनेही हस्तगत केली.

जप्त केलेल्या वाहनांमध्ये तीन रॉयल एनफिल्ड बुलेट (Royal Enfield Bullet) मोटारसायकली, एक यामाहा आरएक्स (Yamaha RX) आणि एक टीव्हीएस स्कूटी (TVS Scooty) यांचा समावेश आहे. या सर्व दुचाकी चोरीच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुढील तपास सुरु

अटक केलेल्या संशयितांनी अन्य कोणत्या चोरीच्या प्रकरणांमध्ये सहभाग घेतला आहे का, याचा तपास मायणा कुडतरी पोलीस करत आहेत. दोन्ही संशयितांना न्यायालयात (Court) हजर करण्यात आले असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, या दिशेने तपास सुरु आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT