Bar Council of Maharashtra and Goa Dainik Gomantak
गोवा

Bar Council of Maharashtra and Goa: बार काऊन्‍सिलवर गोव्‍यासाठी जागा राखीव ठेवण्‍याचा विचार करु: पांडे

Bar Council of Maharashtra and Goa: दक्षिण गोवा वकील संघाकडून वकिलांचा सांस्‍कृतिक मेळावा

सुशांत कुंकळयेकर

Bar Council of Maharashtra and Goa: बार काऊन्‍सिलच्‍या नियमांच्‍या चौकटीत राहून व्‍यवस्‍थापकीय समितीमध्‍ये गोव्‍यासाठी दोन स्‍थायी जागा राखीव ठेवण्‍याच्‍या विनंतीवर विचार करु, असे आश्र्‍वासन बार काऊन्‍सिल ऑफ महाराष्‍ट्र आणि गोवाचे अध्‍यक्ष ॲड. पारिजात एम. पांडे यांनी दिले.

दक्षिण गोवा वकील संघाचे अध्‍यक्ष ॲड. प्रसाद नाईक यांनी अशी जागा राखीव ठेवण्‍याची मागणी संघाने आयोजीत केलेल्‍या गोवा आणि महाराष्‍ट्रातील वकिलांच्‍या सांस्‍कृतिक मेळाव्‍यात केली हाेती.

अॅड. नाईक यांनी निदर्शनास आणून दिले की, गोव्‍यातील वकिलांना निवडणूक लढवणे आणि जिंकणे कठीण जात आहे. कारण त्‍यांना बार काऊन्‍सिलच्‍या निवडणुकीत महाराष्‍ट्रासारख्‍या मोठ्या राज्‍याशी स्‍पर्धा करावी लागते.

गोव्‍याला सदर प्रतिष्‍ठीत संस्‍थेत काही प्रमाणात प्रतिनिधीत्‍व मिळावे म्‍हणून गोव्‍याच्‍या वकिलांसाठी दोन कायमस्‍वरुपी जागा राखीव ठेवल्‍यास ते श्रेयस्‍कर ठरेल असे त्‍यांनी सुचवले.

दक्षिण गोवा वकील संघाने नुकताच बाणावली येथे गोवा आणि महाराष्‍ट्रातील वकिलांचा सांस्‍कृतिक मेळावा आयोजीत केला होता. गोव्‍यातील वकिलांनी त्‍यात विविध सादरीकरणातून गोव्‍याची संस्‍कृती दाखवली.

मेळाव्‍यात ज्‍येष्‍ठ वकिलांचा सत्‍कार बार काऊन्‍सिल ऑफ महाराष्‍ट्र अँड गोवाचे अध्‍यक्ष ॲड. पारिजात एम. पांडे आणि ॲड. संग्राम देसाई (सदस्‍य आणि माजी उपाध्‍यक्ष) यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT