Mahadayi Water Dispute |Goa  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादईप्रकरणीच्या हस्तक्षेप याचिकेत 71 पानी प्रतिज्ञापत्र

लवादाचा निवाडा रद्द करण्यासाठीची भूमिका ठाम

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute कर्नाटककडे हुबळी व धारवाड तालुक्यासाठी मुबलक पाणी असतानाही म्हादईचे पाणी वळवण्यासंदर्भात सुरू असलेल्या निरर्थक प्रयत्नांचा पर्दाफाश करणारे 71 पानी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सरकारच्या विशेष याचिकेत सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

लवादाचा निवाडा (ॲवॉर्ड) रद्द करण्यासाठीची ठाम भूमिका असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार म्हादईसंदर्भात लवादाने निवाडा (ॲवॉर्ड) सादर केला होता. त्याला गोव्यासह महाराष्ट्र व कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे.

गोवा सरकारने हा निवाडा रद्द करण्यासंदर्भातच्या याचिकेत ताम्हणकरांनी यापूर्वीच हस्तक्षेप याचिका सादर केलेली आहे. या याचिकेच्या अनुषंगानेच हे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.

यासंदर्भात सुदीप ताम्हणकर म्हणाले, लवादाचा निवाडा रद्द करून म्हादईचा जलमार्ग पूर्वीचा होता तोच पुन्हा ठेवण्यासाठी आतापर्यंत त्या मार्गावर उभारण्यात आलेले बांधकाम पाडण्याचे निर्देश द्यावेत.

हुबळी व धारवाड या दोन्ही तालुक्यांसाठी कर्नाटककडे कशा प्रकारे मुलबक पाणी आहे व म्हादईचे पाणी वळवून त्याचा कशाप्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न सुरू आहे याची इत्यंभूत माहिती या प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नशीब चमकणार! आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार अतिशय शुभ; कारण... आदित्य-मंगल योग

Goa Today News Live: लुथरा बंधु थायलंडमधून डिपोर्ट; दिल्लीत दाखल झाल्यानंतर गोवा पोलिस दोघांना घेणार ताब्यात

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर 'ड्राय रन' सराव, धुक्यामुळे उद्भवणाऱ्या व्यत्ययासंदर्भात भागधारकांशी ऑपरेशनल तयारीबाबत चर्चा

IPL 2026: 66 दिवस, 84 सामने... 'आयपीएल 2026'चा थरार 'या' तारखेपासून, फायनलची तारीखही जाहीर

Goa Literacy: साक्षरतेत गोवा देशात प्रथम, दर 99.72 टक्‍के : केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT