Airport 
गोवा

Third Airport In Goa: गोव्यात तिसरे विमानतळ? दाबोळीच्या वादात दोन मंत्र्यांनी केले मोठे वक्तव्य

Third Airport In Goa: गेल्या वर्षी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी पुढील 20 वर्षात गोव्यात तिसऱ्या विमानतळाची गरज निर्माण होईल, असे वक्तव्य केले होते.

Pramod Yadav

Third Airport In Goa

गेल्या वर्षी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी पुढील 20 वर्षात गोव्यात तिसऱ्या विमानतळाची गरज निर्माण होईल, असे वक्तव्य केले होते. राज्यातील पर्यटनाला वाढती पसंती लक्षात घेता तिसऱ्या विमानतळाची गरज भासेल असा दावा त्यांनी केला होता.

दरम्यान, अलिकडे दाबोळी विमानतळ बंद होण्याची भीती विरोधकांकडून व्यक्त केली जात असताना राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांनी तिसऱ्या विमानतळाची गरज असल्याचे वक्तव्य केले आहे.

राज्याचे कृषिमंत्री आणि फोंड्याचे आमदार रवी नाईक नेहमीच्या त्यांच्या हटके विधानांसाठी चर्चेत असतात. दाबोळीवरुन वाद सुरु असल्याने त्यांना प्रश्न विचारला असता, दाबोळी विमानतळ बंद होणार नाही. दाबोळी आणि मोपा दोन्ही विमानतळ चालू राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच, भविष्यात गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार असल्यानं गोव्यात तिसऱ्या विमानतळाची गरज भासणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यापूर्वी त्यांनी गोव्यात तिसऱ्या जिल्ह्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते.

दरम्यान, राज्याचे वीज खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी देखील तिसऱ्या विमानतळाबाबत सकारात्मक मत व्यक्त केले आहे. मंत्री सुदिन ढवळीकारांनीही पुढल्या 10 वर्षात राज्यात तिसऱ्या विमानतळाची गरज असल्याचे भाष्य केले आहे.

तिसऱ्या विमानतळाची मागणी काणकोण तालुक्यात केली जाऊ शकते असे भाकितही ढवळीकरांनी केले आहे.

कतार एअरवेजने येत्या 20 जूनपासून फ्लाईट ऑपरेशन दाबोळीवरुन मोपावर वळविण्याची घोषणा केली. मोपावर कामकाज स्थलांतरित करणार कतार एअरवेज तिसरी कंपनी ठरली आहे. यामुळे राज्य सरकार दाबोळी बंद करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT