Goa Made Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Liquor Seized: मडगावातून कर्नाटकात मद्याची वाहतूक, चोर्ला घाटात 36 लाखांचे अवैध मद्य जप्त

Goa Made Liquor Seized: याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास केला जात आहे.

Pramod Yadav

Goa Made Liquor Seized

मडगावातून कर्नाटकात मद्याची वाहतूक करणारा ट्रक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी रोखून कारवाई केली. ट्रकमधून तब्बल 36 लाखांचे अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मडगावातून कर्नाटकात अवैध पद्धतीने मद्याची वाहतूक केली जात होती. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संशयित ट्रकची तपासणी केली असता अवैध मद्यसाठा आढळून आला.

ट्रकातून 72 हजार मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, त्याची किंमत 36 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे.

फोंड्यात 54 हजारांचे मद्य जप्त

फोंड्यात एका दुकानात अवैध पद्धतीने साठवणूक केलेला 54 हजार रुपयांचा मद्यसाठा फोंडा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी 244 मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT