Goa Made Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Made Liquor Seized: सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूची विक्री; 90 दारूच्या बाटल्या जप्त, दोघे ताब्यात

Goa Made Liquor Seized Sawantwadi: तालुक्यात बेकायदा गोवा बनावटीच्या दारूच्या विक्रीविरोधात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली.

Sameer Amunekar

सावंतवाडी: तालुक्यात बेकायदा गोवा बनावटीच्या दारूच्या विक्रीविरोधात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली. दोन ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून एकूण ९० अवैध दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. सिद्धू भीमराव मुलीमणी (वय २६, रा. जिमखाना, सावंतवाडी) आणि महेश कृष्णा वेंगुर्लेकर (वय ४२, रा. सालईवाडा, सावंतवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे हवालदार प्रकाश कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिद्धू मुलीमणी याच्यावर कारवाई केली. या छाप्यात त्याच्या ताब्यातून ४,००० रुपये किमतीच्या ४० गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

त्याच दिवशी रात्री ९.३० वाजता पीएसआय मुळीक, हवालदार दुधवडकर आणि हवालदार अनिल धुरी यांच्या पथकाने सालईवाडा परिसरात छापा घालून महेश कृष्णा वेंगुर्लेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत त्याच्या ताब्यातून ८,००० रुपये किमतीच्या ५० अवैध दारूच्या बाटल्या मिळून आल्या. त्याच्यावरही दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध दारूविक्रीवर पोलिसांची शिताफी

सलग दोन कारवायांमुळे सावंतवाडी तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या व्यावसायिक साखळीमागील मुख्य पुरवठादार शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT