Pune News Dainik Gomantak
गोवा

Pune Crime: पुण्यात गोवा बनावटीची बनावट दारु जप्त; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त, जळगावच्या तरुणाला अटक

Fake Goa Made Liquor Seized In Pune: आयशरमध्ये रॉयल ब्ल्यु व्हिस्कीचे ३०५ बॉक्स आढळून आले. या मद्याची किंमत २४ लाख ८८ लाख ८०० रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

Pramod Yadav

पुणे: पुण्यात गोवा बनावटीचे बनावट मद्य जप्त करण्यात आले आहे. आयशरमधून मद्याची वाहतूक केली जात असताना गुरुवारी (१५ मे) पिंपरी येथे ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी ५२.२८ लाखांचे मुद्देमाल जप्त केला असून, जवळगावच्या ३१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

विशाल सुखलाल वरदे (वय ३१, रा. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. कारवाईत अधिकाऱ्यांनी २४ लाख ८८ लाख ८०० रुपये किंमतीचे मद्य आणि २७ लाख ४० हजार किंमतीचे वाहन असा एकूण ५२ लाख २८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयशरमधून अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली. पुणे - मुंबई जुन्या महामार्गावरुन हा आयशर जात असल्याची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. संशयित आशयरची (एमएच १५ जेसी १३८८) वल्लभनगर बस स्थानक, पिंपरी येथे तपासणी करण्यात आली. आयशरमध्ये अवैध मद्यसाठा आढळून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई केली.

आयशरमध्ये रॉयल ब्ल्यु व्हिस्कीचे ३०५ बॉक्स आढळून आले. या मद्याची किंमत २४ लाख ८८ लाख ८०० रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अशा प्रकारची कारवाई यापुढे देखील सुरुच राहिल असे खात्याने म्हटले आहे. नागरिकांना असा काही संशयास्पद बाब आढळून आल्यास पुणे अबकारी खात्याच्या 020-2612-7321 किंवा टोल फ्री क्रमांक 18002339999 किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SCROLL FOR NEXT