Goa CM On LPG Price Dainik Gomantak
गोवा

LPG Cylinder: गृहीणींसाठी गुड न्यूज! चतुर्थीपूर्वीच खात्यात जमा होणार अनुदानाची रक्कम

सप्टेंबर महिन्याचे अनुदान चतुर्थीपूर्वी खात्यावर जमा होईल

गोमन्तक डिजिटल टीम

LPG Cylinder राज्य सरकारच्या नागरी पुरवठा खात्यातर्फे सुरू झालेल्या अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सिलिंडर रिफिलिंगची अनुदानापोटीची दोन महिन्यांची रक्कम वर्ग झालेली आहे. सप्टेंबर महिन्याचे 275 रुपयांचे अनुदान चतुर्थीपूर्वी त्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती संचालक गोपाळ पार्सेकर यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

राज्य सरकारने विधानसभेत अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना महिन्यासाठी 275 रुपये सिलिंडरसाठी अनुदान देण्याचे जाहीर केले. त्याची अंमलबजावणी या महिन्यापासून करण्यात आली.

त्यानुसार राज्यातील 11 हजार 169 अंत्योदय योजनेचे लाभार्थी कुटुंब असून 1 सप्टेंबरला झालेल्या कार्यक्रमानुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन महिन्यांचे 550 रुपये तत्काळ जमा करावी लागणारी सर्व रक्कम लाभार्थ्यांच्या खाते असलेल्या बँकांकडे वर्ग झालेली आहे.

उर्वरित आता सप्टेंबर महिन्याचे २७५ रुपये चतुर्थीपूर्वी जमा करण्यात येणार आहेत, असे पार्सेकर यांनी नमूद केले. लाभार्थ्यांना तीन महिन्यांची एकूण ८२५ रुपये अनुदानापोटी रक्कम मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते.

त्यानुसार पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा झाली आहे. या अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना तत्काळ मिळण्यासाठी त्यात सुसूत्रता आणण्याचे काम खात्याचे सचिव संजित रॉड्रिग्ज यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

एकूण 475 रुपये कमी दराने मिळणार सिलिंडर

मुख्यमंत्र्यांनी या वर्षीचा गणेशोत्सव अंत्योदय योजनेतील कुटुंबांना आनंदी जावा यासाठी सरकारने ही योजना तत्काळ अंमलात आणली आहे. 275 रुपये राज्य सरकारने कमी केल्याने आणि केंद्र सरकारने आता सरसकट सिलिंडरचे दर 200 रुपयांनी कमी केल्याने अंत्योदयच्या लाभार्थ्यांना महिन्याकाठी 475 रुपये कमी दराने सिलिंडर मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT