V. Satish  Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election: भाजपने कंबर कसली, केंद्रीय सहसचिवांच्या गोव्यात बैठका

व्ही. सतीश यांचे मार्गदर्शन : मतदान केंद्रनिहाय समित्या पडताळणी‍साठी ‘जंबो समिती

गोमन्तक डिजिटल टीम

प्रत्येक मतदानकेंद्रनिहाय स्थापन केलेल्या भाजप समित्यांची पडताळणी करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, इतर काही मंत्री, काही आमदार आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश असलेली 70 जणांची समिती आज स्थापन करण्यात आली.

भाजपचे केंद्रीय सहसचिव (संघटन) व्ही. सतीश यांच्या उपस्थितीत इन्‍स्‍टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सतीश हे आणखी दोन दिवस गोव्यात असतील.

तानावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश चतुर्थीपूर्वी २७ मतदारसंघांतील मतदानकेंद्र समित्यांच्य बैठका घेऊन या समितीतील सदस्य समित्यांची पडताळणी करणार आहेत. उर्वरीत 13 मतदारसंघांतील मतदानकेंद्र समित्यांची पडताळणी चतुर्थीनंतर केली जाणार आहे.

प्रत्येक मतदानकेंद्राच्या पातळीवर भाजपची समिती असावी असा प्रयत्न यावेळी करण्यात येत आहे. काही मतदारसंघांत सर्वच मतदानकेंद्रांवर भाजपच्या समित्या मागील निवडणुकीपर्यंत नव्हत्या.

त्यामुळे राज्यातील सर्वच मतदानकेंद्र पातळीवर भाजपच्या समित्या हव्यात असे लक्ष्य ठेवून गेले दीड वर्ष संघटनात्मक बांधणी करण्यात आली आहे.

कार्यकर्त्यांना सदैव सक्रिय ठेवणारा आणि जनतेच्या सातत्याने संपर्कात असणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. निवडणूक जवळ आली की जनतेसमोर कोणता कार्यक्रम न्यावा यासाठी आम्हाला धावाधाव करावी लागत नाही.

सदैव आम्ही पक्षाचे काम करत असलेले कार्यकर्ते आहोत. त्या कामांचा पुढील दोन दिवसांत व्ही. सतीश विविध बैठकांतून आढावा घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT