Goa Election Dainik Gomantak
गोवा

Goa Election: महिला उमेदवाराचा शोध गतीने! भाजपचे स्थानिक नेते व्यस्त

Goa Election: नव्या नावांचाही होतोय विचार

Ganeshprasad Gogate

Goa Election: लोकसभा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा समावेश झाला नसल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आता उमेदवारीसाठी जिंकून येण्याची क्षमता असलेल्या महिलेच्या शोधाला गती दिली आहे.

येत्या दोन दिवसांत प्रदेश पातळीवर त्या नावावर शिक्कामोर्तब होऊन ते नाव दिल्लीला पाठवले जाण्याची शक्यता आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात राजकीय प्रयोग करण्यास फार वाव नसल्याचे पक्षश्रेष्ठींना भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी सांगून पाहिले आहे.

मात्र, दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात महिला उमेदवाराच्या नावाचा विचार करावा, यावर भाजपचे पक्षश्रेष्ठी आग्रही आहेत.

या मतदारसंघातील उमेदवारीसाठी याआधी शिफारस केलेल्या नावांसह उमेदवारीसाठी नव्याने सुचवलेल्या महिलांच्या नावांचाही विचार करू, असे दिल्लीतून प्रदेश पातळीवरील नेत्यांना सांगण्यात आले आहे.

यामुळे जिंकून येण्याची क्षमता असलेल्या महिला नेत्याचा, सामाजिक कार्यकर्तीचा, महिला उद्योजकाच्या नावांचा विचार भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी सुरू केला आहे.

येत्या दोन दिवसांवर होणाऱ्या प्रदेश पातळीवर निवडणूक समितीच्या बैठकीत दोन-तीन नावांबाबत विचार केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पक्षश्रेष्ठींकडून सूचना:-

भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात महिला उमेदवाराच्या नावाचा विचार करण्याची सूचना पक्षश्रेष्ठींकडून आल्यानंतर अशा उमेदवाराच्या शोधाला गती दिली होती.

मात्र, नंतरच्या काळामध्ये ती मोहीम थोडी थंडावल्यागत झाली होती.

आता पुन्हा त्या मोहिमेला गती देण्यात आली आहे. दोन्ही मतदारसंघांतील प्रचार प्रमुख नेमल्यानंतर जिंकून येण्याची क्षमता असलेल्या महिला उमेदवाराचा शोध गतीने घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beach Shacks: तब्बल 450 शॅक होते, नोंदणीविनाच! शॅकवरही पर्यटन खात्याचा अंकुश; नोंदणी आता अनिवार्य

अशक्य ते शक्य करून दाखवलं! 25 वर्षांच्या पोरानं उचललं 511 किलो वजन; नवा वर्ल्ड रेकॉर्ड पाहून क्रीडाविश्व थक्क, Watch Video

Ketu Gochar 2026: नशिबाची साथ अन् आर्थिक भरभराट! मघा नक्षत्रातील केतु बनवणार 5 राशींना धनवान; पैशांचा होणार पाऊस

Goa Medical Act: गोवा वैद्यकीय हिंसाचार कायद्याचे कलम 7 घटनात्मक आहे का? उच्च न्यायालयात आव्हान; राज्य सरकारला उत्तरासाठी 3 आठवड्यांची मुदत

GIM Student Attack: हॉस्टेलच्या खोलीत झोपलेल्या विद्यार्थिनीवर चाकूने वार! 'जीआयएम'मध्ये खळबळ; सहकारी विद्यार्थिनी अटकेत, 5 दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT