Goa Congress Candidate Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Candidate: भाजपकडून दक्षिण गोव्याचा उमेदवार जाहीर; आता काँग्रेस उमेदवारांची उत्सुकता

Goa Congress Candidate: महिला उमेदवार देणार की पुरुष उमेदवारीवर शिक्कामोर्तब?

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress Candidate: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दक्षिण गोव्याचा उमेदवार रविवारी सायंकाळी जाहीर झाला.

महिला उमेदवार म्हणून पल्लवी धेंपे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, त्यामुळे काँग्रेस आता दक्षिण गोव्यात पुरुष उमेदवारावर विश्‍वास ठेवणार की महिला उमेदवार म्हणून कोणी नव्या चेहऱ्याला संधी देऊन धक्कातंत्राचा वापर करणार याकडे लक्ष लागून आहे.

काँग्रेस उमेदवारांच्या ज्या याद्या जाहीर झाल्या, त्यात दोन्ही उमेदवारींवर शिक्कामोर्तब झाले नाही. दोन तीन दिवसांत उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजपचा दक्षिणेतील उमेदवार जाहीर झाल्यानंतरच काँग्रेस आपले दोन्ही उमेदवार जाहीर करेल असे स्पष्ट होते.

आता भाजपने उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसकडून महिलेविरुद्ध महिलेलाच काँग्रेस उमदेवारी देणार की पुरुष उमेदवारावर विश्‍वास दाखविणार, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

भाजपच्या पल्लवी धेंपे या उमेदवार असल्याने भाजपचे केडर आणि नेते, कार्यकर्ते सोमवारपासून कामाला लागणार आहे.

दक्षिण गोव्याचा उमेदवार किमान ६० हजार मतांच्या फरकाने निवडून येईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे. काँग्रेसला दक्षिण गोव्यातील उमेदवार हा अल्पसंख्यांकांच्या बळावर पुन्हा निवडून येईल, असा आत्मविश्‍वास आहे.

दक्षिण गोव्यात काँग्रेस आत्तापर्यंत मजूबत मानली जात आहे. विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, कॅप्टन विरियातो फर्नांडिस आणि माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची नावे शर्यतीत आहेत.

काँग्रेसने पुरुष उमेदवार दिल्यास ही लढत महिला विरुद्ध पुरुष अशी प्रतिष्ठेची बनेल. परंतु काँग्रेसने महिला उमेदवार म्हणून एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी दिलीच, तर दोन्ही पक्षासाठी दक्षिणेतील लढत प्रतिष्ठेची राहील.

आजपर्यंत पक्षासाठी काम करणाऱ्या महिलांवर हा अन्याय आहे. महिला मोर्चामधील महिलांनी केवळ पक्षाचे काम करायचे.

ढोल-ताशे वाजवायचे आणि आयात उमेदवाराला उमेदवारी द्यायची असा हा प्रकार आहे.

- ॲड. अमित पालेकर, निमंत्रक, आम आदमी पक्ष

भाजपमध्ये येताच त्यांना उमेदवारी दिली गेली आहे. ज्यांनी पक्षासाठी कार्य केले आहे आणि पक्ष बांधला आहे, त्या कार्यकर्त्यांकडे भाजपने दुर्लक्ष केले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांतून उमेदवार मिळू नये, ही दुर्दैवी बाब आहे.

- अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT