Cash Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: फोंडाघाट चेकनाक्‍यावर 10 लाखांची रोकड जप्त

Goa Crime: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime: सांगलीहून गोव्यात येणाऱ्या गोव्यातील एका कारमधून तब्‍बल दहा लाख रुपयांची रोकड आज फोंडाघाट चेकनाक्‍यावर ताब्‍यात घेण्यात आली.

आज सकाळी 11 वाजता ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कारचालक अब्‍दुल मतीन इम्तियाज तांबोळी (रा. सांगली) याच्याकडून अधिक माहिती कणकवली पोलिस आणि आयकर अधिकारी घेत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व चेकनाक्‍यांवर सर्वप्रकारच्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता सांगलीहून गोव्यात येणारी कार (जीए - ०३ - झेड - ६३६२) फोंडाघाट चेकनाक्‍यावर थांबविण्यात आली.

या कारची तपासणी स्थिर सर्वेक्षण पथकाने केली. त्यावेळी कारमधील एका बॅगेत १० लाख रुपयांची रोकड सापडली. त्‍यानंतर ही माहिती तातडीने वरिष्‍ठ पोलिस अधिकाऱ्यांना कळविण्यात आली.

कारचालक अब्‍दुल तांबोळी याची चौकशी केली असता त्‍याने आपण आर्किटेक्‍ट आहे. तसेच गोव्यात आपली कंपनी असून तेथील कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी ही रक्‍कम नेत असल्‍याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT