Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Election: कणकुंबी येथे 7.98 लाखांची बेहिशेबी रोकड जप्त; सीमावर्ती भागात पोलिस, निवडणूक अधिकारी अलर्ट मोडवर

Goa Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा-कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कडक तपासणी सुरु

Ganeshprasad Gogate

Goa Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा-कर्नाटक- महाराष्ट्र राज्याच्या सीमेच्या चेकनाक्यावर अबकारी व पोलिस खात्याकडून वाहनांची तपासणी सुरू केलेली आहे.

गोव्यातून कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच अन्य राज्यात बेकायदेशीररीत्या दारूची वाहतूक होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली आहे.

यांच पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी हाती येतेय. खानापूर निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या पथकाने कणकुंबी येथे कारमधून नेण्यात येणारी तब्बल 7.98 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केलीय. सदर कार गोव्याहून बेळगाव येथे जात असल्याची माहिती मिळाली आहे.

अशा प्रकारची वाहने आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून या तपासणीला सुरवात झाली असून लोकसभा निवडणूक होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

गोवा राज्यातून कर्नाटकातील बेळगाव या ठिकाणी जाण्यासाठी केरीमार्गे चोर्ला या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असते.

प्रवासी वाहतूक त्याचप्रमाणे मालवाहतूक याच मार्गाने होत असल्यामुळे सातत्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते.

लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे. 7 मे रोजी गोव्यातील दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ही तपासणी हाती घेण्यात आलेली आहे.

प्रत्येक वाहनाची कडक तपासणी करण्यात येत आहे. यासाठी अबकारी खात्याच्या वाळपई विभागातर्फे तपासणी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून 24 तास या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

गोव्यातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे. कारण गोव्यातील दारूला कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे सातत्याने गोव्यातील दारूची चोरट्या पद्धतीने वाहतूक केली जाते.

अल्कोहोल तपासणीही केली जाते

मालवाहू वाहनांच्या तपासणीबरोबर चारचाकी व दुचाकीचालकांची अल्कोहोल तपासणी केली जाते आहे. केरी चेकनाक्यावर एकूण 49 वाहनांची तपासणी केली आहे तर 139 जणांची वैयक्तिक तपासणी केली आहे.

त्याचबरोबर पर्ये चेकनाक्यावर 17 वाहनांची तर वैयक्तिक 34 जणांची तपासणी केली आहे. ही कारवाई तसेच तपासणी लोकसभा निवडणूक होईपर्यंत केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT