Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

'सां जुझे' प्रकरणी कायदेशीर औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक होते; निवडणूकाजवळ आल्यानेच ‘ध्रुवीकरण’ सुरू- पाटकर

Goa Congress: फुटीरतावादी शक्तींना आपल्यात फूट निर्माण करू देऊ नका- पाटकर

Ganeshprasad Gogate

Goa Congress: छत्रपती शिवाजी महाराज हे दडपशाहीविरुद्ध लढणारे आणि जनतेच्या हक्कांसाठी उभे राहिलेले नेते होते. त्यांचा समतेवर विश्वास होता. छत्रपतीनी सर्व जाती-धर्मातील लोकांना आदराने वागवले, असे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

सांव जुझे दे आरीएल येथे छत्रपती शिवाजींच्या पुतळ्याच्या स्थापनेदरम्यान झालेल्या सामाजिक तणावाच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून तसेच आवश्यक परवानग्या घेतल्याची खात्री करुनच सदर पुतळ्याची स्थापना करणे ही समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांची नैतिक जबाबदारी होती.

स्थानिक लोकांना विश्वासात घेवूनच कोणताही उपक्रम हाती घेणे नेहमीच फायद्याचे असल्याचे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने भाजपने पुन्हा एकदा ‘ध्रुवीकरण’ सुरू केल्याचे दिसते. गोव्यात जातीय सलोखा राखण्यासाठी मी शांतताप्रिय गोमंतकीयांना नम्रपणे आवाहन करतो.

फुटीरतावादी शक्तींना आपल्यात फूट निर्माण करू देऊ नका, असे आवाहन अमित पाटकर यांनी केले.

समाजकल्याण आणि पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई सां जुझे दी अरीयाल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आनावरण करुन परतत असताना त्यांच्यावर मातीफेक करण्यात आली.

जमावाने फळदेसाई यांच्या दिशेने मातीफेक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यात जमावावर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. मात्र धार्मिक सलोखा राखण्यासाठी याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करणार नसल्याचे स्पष्टीकरण फळदेसाई यांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tragic Death: चिमुकलीने गिळला जिवंत मासा, बस्तोड्यातील दुर्दैवी घटना; 6 वर्षाच्या बाळाचा मृत्यू

Mohammed Siraj: सिराज 5 विकेट घेणार, माजी गोलंदाजांचे बोलणे ठरले खरे; ट्विट होतेय Viral

Rashi Bhavishya 05 August 2025: घरात मंगल कार्याची चर्चा, बँक व्यवहारात फायदा; संयमाने व्यवहार करा

Goa Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळ फेरबदल कधी? दामू नाईकांनी टाळले उत्तर, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी..

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT