Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात आज केवळ 09 कोरोना रूग्णांची नोंद, 21 डिस्चार्ज

राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.42 टक्के एवढा झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासांत केवळ 09 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर, 21 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असून, सध्याच्या घडीला राज्यात 79 सक्रिय कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases in Goa) उपचार सुरू आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.42 टक्के एवढा झाला आहे.

गोवा आरोग्य विभागाच्या (Goa Health Department) वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 58 हजार 893 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 54 हजार 801 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजवर राज्यात 4,013 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 630 प्रयोगशाळा नमूने तपासण्यात आले आहेत.

गोव्यात कोरोना संसर्गाचे वेग मंदावला असून, नव्याने वाढ होणाऱ्या रूग्णांची संख्या कमी झाली आहे. यासह बरे होणाऱ्या रूग्णांची संख्येत वाढ झाल्याने सक्रिय रूग्णसंख्या देखील कमी झाली आहे. तसेच, देशातील देखील सक्रिय रूग्णांच्या संख्येत देखील मोठी घट झाली असून, सध्याच्या घडीला देशात भारतात सध्याच्या घडीला 14,021 सक्रिय कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases) उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

SCROLL FOR NEXT