Goa Lockdown Chief Minister Pramod Sawant took the decision of lockdown under the pressure of the ministers 
गोवा

Goa Lockdown: मंत्र्यांच्या दबावापुढे मुख्यमंत्री नमले 

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: गोवा सरकारने आज जाहीर केले की, राज्यात कोविड संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उद्या गुरुवारी 29 रोजी संध्याकाळी ते सोमवारी सकाळी 3 मे पर्यंत कडक अंशतः लॉकडाऊनची घोषणा आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. लॉकडाऊनची गरज नाही अशी ठासून सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मंत्र्यांनीच किमान अंशतः लॉकडाऊन करण्याची मागणी केल्यावर अखेर त्यांना हा निर्णय मान्य करावा लागला. 

दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी राज्यात लॉकडाऊनची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर काल मंत्री मायकल लोबो व किनारपट्टी क्षेत्रातील पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी किमान अंशतः लॉकडाऊनची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यामुळे आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी मंत्री व आमदार यांच्याशी चर्चा करून राज्यात पूर्ण लॉकडाऊन न करता तो अंशतः करण्यावर एकमत झाले.

त्यामुळे या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा आणि उद्योग बंद राहणार नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी किनारपट्टी भागातील काही क्षेत्रे या अंशतः लॉकडाऊनच्या काळात सील करण्यात येणार आहेत. सध्या राज्यात दरदिवशी दोन हजाराहून अधिक कोरोना संसर्गाची नोंद होत असल्याने लोकांची वाहतूक रोखण्यास त्याची आवश्‍यकता आहे. 

या अंशतः लॉकडाऊनमुळे जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही कारण या काळात आवश्‍यक सेवा सुरू राहणार आहे मात्र सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असेल. या काळात विविध शहरात तसेच गावामध्ये आठवड्याचा बाजार व कॅसिनो बंद असतील. 3 मे रोजी सकाळी हा अंशतः लॉकडाऊन उठविला जाईल व नेहमीप्रमाणे व्यवसाय सुरू होतील. यासंदर्भातची सविस्तर अधिसूचना आज संध्याकाळी राज्य प्रशासन काढील असे सावंत म्हणाले. 

कोरोना संसर्गाची लक्षणे आढळल्यास किंवा कोरोना चाचणी केलेल्यांनी नव्याने काढण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेच्या पत्रकात नमूद केलेली औषधे घेण्यास सुरुवात करावी जेणेकरून कोरोना संसर्गाची तीव्रता वाढणार नाही व रुग्णाला इस्पितळात दाखल करण्यापर्यंत नौबत येणार नाही. सरकारने कोविड - 19  उपचाराच्या शिष्टाचारमध्ये यापूर्वी बदल केला आहे जो कोरोना चाचणी अहवालाची वाट न पाहता औषधे कोणती घ्यावी याची माहिती देतो.

सध्या कोरोना चाचणी करून घेण्यासाठी प्राथमिक व सामुदायिक आरोग्य केंद्रात लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने राज्य सरकारने ही चाचणी तपासणी केंद्रामध्येच ठेवून लसीकरणाची व्यवस्था इतर सरकारच्या रिक्त जागेत किंवा शाळांमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना चाचणी व लसीकरण या दोघांसाठी येणाऱ्या लोकांचा एकमेकाशी संपर्क होऊ नये व कोरोनाचा प्रसार वाढू नये यामागील उद्दिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT