Goa locals in drug business Dainik Gomantak
गोवा

झटपट पैशांचा मोह आवरेना! स्‍थानिकांचा कल ड्रग्‍स व्‍यवसायाकडे; सरकारची विधानसभेत माहिती

Goa locals in drug business: झटपट पैसे मिळावेत यासाठीच गोव्यातील लोक अंमलीपदार्थ व्यापाराकडे वळतात, असे राज्य सरकारने विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: झटपट पैसे मिळावेत यासाठीच गोव्यातील लोक अंमलीपदार्थ व्यापाराकडे वळतात, असे राज्य सरकारने विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.

ही माहिती अंमलीपदार्थ तस्करी प्रकरणांतील तपास नोंदी, गुप्तचर माहिती आणि अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या कबुलीजबाबांवर आधारित आहे. गृहमंत्रालयाने केलेल्या विश्लेषणानुसार, ‘झटपट आर्थिक लाभाचे आकर्षण’ हे सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. विशेषतः पर्यटन व नाईट लाईफ क्षेत्राशी संबंधित तरुणांमध्ये सहकाऱ्यांचा प्रभाव, ड्रग्‍स नेटवर्कशी संबंध आणि सामाजिक संपर्क ही देखील कारणे महत्त्वाची ठरत आहेत.

विधानसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये १२१ प्रकरणे नोंदवली गेली होती, ज्यात २९ गोमंतकीय, ८७ परराज्यांतील आणि २२ परदेशी नागरिकांना अटक झाली होती. २०२२ मध्ये १५४ प्रकरणे (५७ गोमंतकीय, १०४ परप्रांतीय, २९ विदेशी), २०२३ मध्ये १४० प्रकरणे (४७ गोमंतकीय, ९८ परप्रांतीय, २१ विदेशी) नोंदवली गेली.

त्यानंतर प्रकरणांची संख्या १६२ पर्यंत वाढली, ज्यात ५५ गोमंतकीय, ११३ परप्रांतीय आणि २४ विदेशी नागरिकांचा समावेश होता. २०२५ मध्ये १६३ प्रकरणे नोंदवली गेली असून त्यात ७६ गोमंतकीय, १०५ परप्रांतीय आणि ३२ विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली.

जप्तीच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये १७१.२ किलो, २०२४ मध्ये २७५.०८ किलो आणि २०२५ मध्ये २३४.२८ किलो अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले. एप्रिल २०२४ मध्ये गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रँचने ४.३२५ किलो कोकेन जप्त करत तिघांना अटक केली होती. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ४३.२ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

ड्रग्‍स व्यापाराकडे वळण्याची प्रमुख कारणे

झटपट आर्थिक लाभाचे आकर्षण, आर्थिक गरज व हेतू, विद्यमान ड्रग्‍स नेटवर्कशी संपर्क, सहकाऱ्यांचा दबाव व प्रभाव, पर्यटन व नाईट लाईफ क्षेत्रातील वातावरण.

सरकारची कारवाई, उपाययोजना

पोलिस, क्राईम ब्रँच व अँटी-नार्कोटिक्स सेल सक्रिय. गुप्तचर माहितीच्या आधारे छापे. पर्यटनस्थळी गस्त व नाकाबंदी वाढवली. बार, रेस्टॉरंट्स, शॅक्सवर अचानक तपासण्या. युवकांसाठी जनजागृती व पुनर्वसन उपक्रम. समुदाय पातळीवर पोलिस गस्‍त.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Team India New Coach: गोव्याचा सुपुत्र आता टीम इंडियाचा 'बॉस'! महेश गवळी यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

महासत्ता अमेरिकेवर 39 ट्रिलियन डॉलरचे कर्ज; करकपात, युद्धांवरील खर्चामुळे बोजा वाढला

IFL 2026: धेंपो क्लबला पहिल्या विजयाची प्रतीक्षा, तीन लढतीतून दोन गुण; गोकुळम केरळाविरुद्ध आज सामना

Dhurandhar 2 Collection: बॉक्स ऑफिसवर 'हमजा अली'चा धुमाकूळ! पहिल्याच दिवशी तोडला मोठा विक्रम; कलेक्शन 100 कोटी पार

Ahmed Shahzad slams PSL: "IPL च सरस!" 'पीएसएल'वर भडकला पाकिस्तानी स्टार खेळाडू; सांगितल्या 'या' 3 मोठ्या चुका

SCROLL FOR NEXT