गोवा

Goa News: गोव्याची सुमार फलंदाजी; दिवसभरात पडल्या 16 विकेट्स; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Latest News in Marathi: जाणून घ्या गोव्यात घडणाऱ्या ताज्या घडामोडी

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याची सुमार फलंदाजी; दिवसभरात पडल्या 16 विकेट्स

गोव्याचा 179 धावांत गुंडाळल्यानंतर नागालँडने रणजी ट्रॉफी प्लेट क्रिकेटमध्ये पहिल्या दिवसअखेर 6 बाद 74 धावा केल्या. दिवसभरात 16 विकेट पडल्या.

मुख्यमंत्री सावंत महाराष्ट्र निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भाजपचा प्रचार करणार. भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

कॅनेडियन रॉक आयकॉन ब्रायन अॅडम्सच्या आगामी वर्ल्ड टुरमध्ये गोव्याचा समावेश

भारत-कॅनडा यांच्यात वाद सुरु असताना कॅनेडियन रॉक आयकॉन ब्रायन अॅडम्सने आपल्या आगामी SO Happy IT HUSRTS वर्ल्ड टुरमध्ये केला गोव्याचा समावेश. अॅडम्स 17 डिसेंबर 2024 रोजी बांबोळीतील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सादरीकरण करणार आहे.

नागालँडच्या गोलंदाजांचा आक्रमक अंदाज; गोव्याला 179 धावांत गुंडाळले

पणजी जिमखाना येथे सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी प्लेट डिव्हिजन क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात नागालँडने गोव्याला 179 धावांत गुंडाळले.

कोलवाळ येथे फुलांचे हार विकणाऱ्या दोघांमध्ये व्यवसायावरुन चाकू हल्ला

कोलवाळ येथे फुलांचे हार विकणाऱ्या दोघांमध्ये व्यवसायावरुन सुरु हल्ला. जंग बहादूर ( वय वर्ष 50 रा. थिवी) आणि देवानंद माळी ( वय वर्ष, 19, रेवोडा) जखमी. दोघांवर गोमेकॉमध्ये उपचार सुरु.

जर्मनीचे चान्सलर ओल्फ यांचे गोव्यात आगमन!

फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांचे गोव्यात आगमन. INS हंसा येथे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.

''जमीन संरक्षण विधेयक गरजेचं...''; आमदार विरेश बोरकरांचा हल्लाबोल

राज्यातील जमिनीचे रक्षण करण्यासाठी जमीन संरक्षण विधेयक गरजेचे. भाषणे देऊन काहीच होणार नाही. सरकार पळवाट काढत असल्याने विधेयक हवेच. विधेयकासाठी कुठल्याही अमदराबरोबर डिबेट करण्यास तयार : आमदार विरेश बोरकरांचा हल्लाबोल

डिचोली 'आयटीआय'चा दीक्षांत सोहळा!

डिचोली औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा दीक्षांत सोहळा. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे वितरीत.

GHRDC जॉब फॉर्म, सरकारने केली 15 लाखांची कमाई!

गोवा मानव संसाधन विकास महामंडळाने 945 पदांसाठी अर्ज भरुन 15 लाखांची कमाई केली आहे. सुमारे 30 हजार अर्जदारांनी अर्ज केला, फॉर्मची किंमत प्रत्येकी 50 रुपये होती: आम आदमी पार्टीचा घणाघात.

दक्षिण गोवा खासदारांकडून महामार्ग रुंदीकरणाबाबत स्थानिक समस्यांचा आढावा!

केरये, खांडेपार येथे दक्षिण गोवा खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी भेट देऊन, महामार्ग रुंदिकरणामुळे स्थानिकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.

पोलीस कॉन्स्टेबलने झुआरी पुलावरुन मारली उडी!

नवीन झुआरी पुलावरुन एका पोलिस कॉन्स्टेबलने नदीत उडी मारली. अग्निशमन दल, किनारी पोलिस आणि आगाशी पोलिसांकडून शोध मोहीम सुरु.

जागतिक कोकणी मंचाचा निषेध!

अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या 33व्या अधिवेशनावर बहिष्कार टाकण्यासाठी ग्लोबल कोंकणी मंचाने आपला विरोध सुरु केला आहे.

काकोडा औद्योगोक वसाहतीतील गौरी पॅकेजिंगला भीषण आग

काकोडा औद्योगोक वसाहतीतील गौरी पॅकेजिंगमध्ये आज (दि. २६ ऑक्टोबर) रोजी पहाटे ४.३० च्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच कुडचडे, फोंडा आणि कुक्कळीच्या अग्नीशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

SCROLL FOR NEXT