Goa Live Updates 26 December Dainik Gomantak
गोवा

Goa Updates 26 December: गोव्यातील दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Kavya Powar

आमदार दिलायला लोबो यांच्या हस्ते रस्तेकामाचा प्रारंभ

स्वामी समर्थ मंदिर ते अल्बा हाऊस रस्ताच्या हॉटमिक्स कामाचा प्रारंभ शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांच्याहस्ते झाला. यावेळी शिवोली दांडो येथील जगरेश्वर मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते.

ट्रॅफिक पोलिसाने शिविगाळ केल्याची तक्रार 

वेरे येथील रविंद्र उडैयार यांनी ट्रॅफिक पोलिसाविरोधात तक्रार दाखल केली आहे. ट्रॅफिक पोलिसांनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ केली. वेरे येथे हा प्रकार घडला. सध्या या प्रकाराची चौकशी केली जात आहे.

सनबर्न फेस्टिव्हल स्थळाची पोलिसांनी केली पाहणी 

उत्तर गोवा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निधिन वाल्सन, डीवायएसपी जिवबा दळवी, हणजुणे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी सनबर्न फेस्टिव्हल होणाऱ्या वागातोर येथील स्थळाची पाहणी केली.

साखळीत दत्तजयंती उत्साहात साजरी

साखळी येथील श्री दत्तात्रय मंदिरात श्री दत्तजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संध्याकाळी श्री दत्त जन्मसोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.

अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी हणजूणमध्ये दोघांना अटक

हणजूण येथे आज पहाटे गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेने छापा टाकून किशोर मंगेश दिवकर (४१, हडफडे) व गुरुदास ज्योतिबा भातखंडे (३३, शिवोली) या दोघांना अंमलीपदार्थप्रकरणी अटक केली. दोघांकडून एक्स्टसी गोळ्या जप्त केल्या. त्याची किंमत सुमारे १ लाख रुपये आहे.

लोटली ग्रामपंचायतीद्वारे सामाजिक संदेश संकेत फलकांची यशस्वी अंमलबजावणी

गावात लोकांमध्‍ये जागृती व्‍हावी यासाठी लोटली ग्रामपंचायतीने ‘सामाजिक संदेश’ फलक ही अभिनव योजना सुरु केली असून लोटलीच्‍या सरपंच जोआना फर्नांडिस आणि सचिव अमोल तिळवे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक संदेश देणारे फलक बसवण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. पंचायतींतील सर्व नऊ प्रभागांमध्ये हा प्रशंसनीय असा उपक्रम हाती घेण्यात आला.

मडगावची आग म्हणजे गोव्यासाठी टिकींग बॉम्बचा आणखी एक धोक्याचा इशारा...

मडगावमधील न्यू मार्केट येथे आजची आगीची घटना ही गोव्यातील विविध ठिकाणी पसरलेल्या टिकिंग बॉम्बचा आणखी एक इशारा आहे. सरकार आणि नागरिकांनी पुढच्या धोक्याची जाणीव करून सुधारात्मक पावले उचलण्याची वेळ आली आहे.

अग्निशमन दलासाठी रस्त्यातील अडथळे, अग्निशमन दलाकडील साधनांचा अभाव हे आज पुन्हा एकदा समोर आले, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

दाबोळी विमानतळ काहीकाळ लँडिंगसाठी राहणार बंद 

दाबोळी विमानतळावरील रनवे दुपारी ३.३० पर्यंत बंद राहिल. या वेळेपर्यंत विमानतळावर एकही विमान उतरणार नाही, अशी माहिती विमानतळ संचालक धनंजय राव यांनी दिली.

संपूर्ण साखळीमध्ये वीजखांब व पथदिवे बसविणार

ज्या ठिकाणी वीज खांब व पथदिवे नाहीत त्या सर्व भागांमध्ये खांब व पथदिवे घालून अंधार दूर करण्यासाठी साखळी नगरपालिका प्रयत्नरत असून वीज खात्याकडे तशी मागणी करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात हि मागणी पूर्ण होणार, अशी माहिती साखळीच्या नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी दिली. दिनकरनगर साखळी येथे नव्याने बसविण्यात येणाऱ्या वीज खांब व पथदीपांच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा रश्मी देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

दाबोळीवर मिग-29 फायटर जेटचा टायर फुटला

दाबोळी विमानतळावर मिग-29 फायटर जेटचा टायर फुटला. टायर फुटल्याने लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

MIG 29 Tyre burst

किस ऑफ लव्ह! अभिनेता रोनित रॉयने 58 व्या वर्षी पुन्हा केले लग्न, गोव्यात रंगला लग्नसोहळा

प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेते रोनित रॉय यांनी दुसऱ्यांदा लग्न केले आहे. गोव्यात त्यांनी पत्नी नीलम सिंगसोबत लग्नाचा 20 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त रोनित यांनी पत्नी नीलमसोबत पुन्हा सात फेरे घेतले.

गोव्यातील एका मंदिरात दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातला आणि अग्निच्या साक्षीने सात फेरे घेतले. यावेळी अभिनेत्याचा 16 वर्षांचा मुलगा अगस्त्यही उपस्थित होता.

बेती-साळगाव रस्त्याला गुरू गोविंद सिंह यांचे नाव

बेती-साळगाव मार्गावरील बेती गुरुद्वारा समोरील रस्त्याला गुरू गोविंद सिंह असे नाव देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. बेती येथील शाळेत वीर बाल दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.

betim news

बांबोळी महामार्गावर सकाळी दोन आपघात; चारही वाहनांचे नुकसान

बांबोळी महामार्गावर मंगळवारी सकाळी दोन अपघात झाले. पहिल्या अपघातात टेम्पोने इलेक्ट्रिक कारला धडक दिली तर दुसऱ्या घटनेत भरधाव स्कॉडा कारने दुसऱ्या कारला मागून धडक दिली.

दोन्ही अपघातात सुदैवाने कोणलाही गंभीर दुखापत झालेली नाही, मात्र, चारही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

मडगाव नवीन बाजारातील दुकानाला भीषण आग

मडगाव नवीन बाजार येथील एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागण्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आली आहे.

साखळीत जलवाहिनी दुसऱ्यांदा फुटली; हजारो लीटर पाणी वाया

काही दिवसांपूर्वी साखळीमध्ये सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाकडे जाणारी जलवाहिनी फुटली होती. ती दुरुस्त करण्यात आली होती. मात्र सध्या ती पुन्हा फुटली असून हजारो लीटर पाणी वाया जात आहे

मोलेतील अभिनव विद्यामंदिर चोरट्यांनी फोडले

मोलेतील अभिनव विद्यामंदिर अज्ञात चोरट्यांनी फोडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बुरखाधारी चोरटे दिसले. चोरट्यांच्या हाती काहीच सापडले नाही. कुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.

जुने गोवेत लाखोंच्या संख्येने पर्यटक

तिसवाडी, राज्यात सोमवारी (ता.२५) मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात आला. त्यात ख्रिसमसचा मोठा विकेंड आल्याने लाखोंच्या संख्येने पर्यटकांचे आगमन झाले आहे. सोमवारी ख्रिसमसच्या दिवशी जुने गोवेत पर्यटकांनी गर्दी केली होती.

राज्यातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ... 

साखळीतील महालक्ष्मी विद्यालयात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्याध्यापकांचे केबिन फोडून चोरांनी 65 हजारांची रोकड लंपास केली आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.37

Panjim ₹ 97.37

South Goa ₹ 97.75

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.93

Panjim ₹ 89.93

South Goa ₹ 90.29

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT