गोविद गावडे  Dainik Gomantak
गोवा

Goa News: भोम राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण, देवस्थान सुरक्षित: मंत्री गोविंद गावडे

Goa Latest News in Marathi: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी

गोमन्तक डिजिटल टीम

भोम राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण, देवस्थान सुरक्षित: मंत्री गावडे

भोम येथील नियोजित राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणावेळी या भागातील कोणत्याही देवस्थानला धक्का पोहोचणार नाही. तसेच रुंदीकरणासाठी जाणाऱ्या घरांचे पुनर्वसन आणि जमीनदारांना योग्य मोबदला देणार. स्थानिक देवस्थानाला धक्का पोहोचत असल्यास स्वतः भोमवासीयांच्या लढ्याचे नेतृत्व करण्याचे मंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन.

दूधसागर पर्यटन हंगाम: सावर्डेतील भाजप कार्यकर्ते एकजूट!

कुळे दूधसागर पर्यटन हंगामाचा प्रश्न सोडवून व काऊंटर बंद करण्यासाठी सावर्डे मतदार संघातील भाजप कार्यकर्ते एकत्रित. काऊंटर बंद करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आमदारसहित चर्चा करणार.

अन् विठूरायाच्या दर्शनाचे 'तीचे' स्वप्न राहिले अपुरे..!

अन् पंढरपूरच्या विठूरायाच्या दर्शनाचे 'तीचे' स्वप्न राहिले अपुरे..! गुरुवारी डिचोलीच्या बाजारात अचानक कोसळलेली 'ती' महिला मृत्यूमुखी. मये येथील मृत सुधा चोडणकर या आज सायंकाळी जाणार होत्या पंढरपुरला.

उर्दू प्रश्नपत्रिका घोळ, गोवा बोर्डचीच चूक : अध्यक्ष भगिरथ शेट्ये

इयत्ता नववीतील उर्दू विषयाच्या प्रथम सत्र परिक्षेत प्रश्नपत्रिकेसमवेत उत्तरपत्रिका पोहचण्याची चूक ही गोवा बोर्डची आहे. गोवा बोर्ड अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांच्याकडून चूक मान्य. गोमन्तक टीव्हीने ही बातमी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारित केली होती.

तिवीकरांचा खासगी विद्यापीठाविरोधात निदर्शने!

खासगी विद्यापीठाच्या प्रकल्पाला तिवीवासीयांसह खरगली ग्रामस्थांचा विरोध. या प्रकल्पामुळे संसाधनांवर, जमिनीच्या अधिकारांवर आणि भावी पिढ्यांवर परिणाम होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

राज्यातील नेत्यांच्या नावाचा गैरवापर करुन गोमंतकीयांची फसवणूक; पोलिस तक्रार दाखल!

नेत्यांच्या नावांचा गैरवापर करुन लोकांना व्हाट्सअॅपद्वारे टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कृषीमंत्री रवी नाईक, वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्यानंतर आता अज्ञाताने आमदार जीत आरोलकर आणि निलेश काब्राल यांची नावे वापरुन लोकांची फसवणूक सुरु केल्याचे उघड. पोलिसांत तक्रार दाखल.

धार्मिक तेढ करणाऱ्या व्यक्तीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

बरभाट, शंकरवाडी -ताळगाव येथे पालखी मिरवणूकीवेळी अडवणूक करुन धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

गोवा बोर्डच्या प्रश्नपत्रिकेत घोळ!

इयत्ता नववीच्या उर्दू विषयाच्या प्रश्नपत्रिकेत घोळ. प्रथम सत्र परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेसमवेत उत्तरपत्रिका. डिचोलीतील शाळांनी प्रकार उघडकीस. गोवा बोर्डाचा निष्काळजीपणा उघड्यावर.

तळीत बुडून महिलेचा मृत्यू!

बेतोडा पंचायत क्षेत्रातील मनकटेमळ - निरंकाल येथील प्रभा प्रकाश सामंत (६८) या वृद्ध महिलेचा बागायतीतील तळीत बुडून मृत्यू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अन्.. विठूरायाच्या दर्शनाचे स्वप्न राहिले अपुरे..! डिचोलीच्या बाजारात कोसळून वृद्धा मृत्यूमुखी

Goa Question Paper Scam:डिचोलीत प्रश्नपत्रिका अन् उत्तरप्रत्रिकांचा घोळ, गोवा बोर्डाचीच चूक; शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांची कबुली

Goa News: तीन वर्षांत चार जणांचे बळी; तोणीर धबधब्याबाबत वाळपई पोलीस सतर्क

Ladki Bahini Yojana: 'लाडकी बहीण योजना' ठरणार गेम चेंजर? महाराष्ट्रातील महिलांची पसंती; विरोधकांचा डाव फसला

Mershi Murder Case: मेरशी खूनप्रकरणातील संशयिताला हायकोर्टाकडून सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT