अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील कॅसिनो बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी (दि.22) पहाटे 8 ते सायंकाळी 4 या वेळेत कॅसिनोमधील गेम्स बंद राहणार आहेत. कॅसिनो मालकांनी स्वेच्छेने हा निर्णय घेतला आहे.
दक्षिण गोव्यातील काब-दी-राम येथे पत्नीचा खून केल्या प्रकरणी गौरव कटियार याला अटक कुंकळ्ळी पोलिसांनी केली. गौरवला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मूळचा लखनऊ येथील असणारा संशयित गौरव एका नामांकीत हॉटेलमध्ये मॅनेजर आहे. शुक्रवारी (दि.19) दुपारी त्याने पत्नीचा समुद्रकिनारी खून केल्याचे उघडकीस आले आहे.
लेफ्टनंट कर्नल जीसस फुर्तादो यांना तीन वर्षापूर्वी गोव्याचे पोलीस अधीक्षक (मुख्यालय) बॉस्युएट सिल्वा यांच्या कुत्र्यांनी चावा घेतला. फुर्तादो मागील तीन वर्षापासून न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
फुर्तादो यांनी आता गोवा मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली असून, या प्रकरणाची सुनावणी 29 जानेवारीला होण्याची शक्यता आहे. सिल्वा सध्या अमली पदार्थ विरोधी सेलमध्ये एसपी आहेत.
श्री राम जन्म भूमी मंदिर अयोध्या येथे रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 रोजी होत असून याच पार्श्वूमीवर म्हापशात श्री रामरथ नगर फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी २१ रोजी संध्याकाळी 5 वाजता खोर्ली येथील सिद्धिविनायक मंदिरापासून प्रारंभ होईल. फेरीचा या समारोप रामरथ म्हापशातील श्री महारुद्र मंदिरात होईल.
लोकसभा निवडणुकीपूर्वी 21 फेब्रुवारीला मांद्रे गावचे सरपंच अॅड. अमित सावंत सरपंचपदाचा राजीनामा देणार आहेत. तसेच गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पुढील राजकीय वाटचाल निश्चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अयोध्या येथे सोमवारी 22 जानेवारीला होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणपतिष्ठा सोहळ्यानिमित्त गोव्यातील सर्व बँकांना सार्वजनिक सुट्टी जाहीर जाहीर करण्यात आली आहे. याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
एकीकडे येत्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन करणारे अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात 'आप'शिवाय पर्याय नाही असे वक्तव्य केले आहे.
गोव्यात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.
गोव्यात मागील काही दिवसांपासून दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा गाजत आहे. माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी या मुद्याचे समर्थन केल्यानंतर आता माजी राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांनी 'पुदुच्चेरीत चालतं असले तर मग गोव्यात का नाही', असे म्हणत दुहेरी नागरिकत्वाचे समर्थन केले आहे.
अस्नोडामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी सोमवारी (22 जानेवारी) मद्यालये, चिकन सेंटर आणि मासळी मार्केट बंद राहणार. पंचायतीतर्फे परिपत्रक जारी.
राज्यात रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यास निर्बंध असतानाही हे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे. हणजूणमध्ये नागरिकांनी याबाबत तक्रार केल्यानंतर शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी हणजूण पोलिसांना रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मडगाव शहरासाठी तयार केलेला मास्टर प्लॅन सार्वजनिक केला गेला पाहिजे. आराखडा तयार करताना सल्लागाराने मला विश्वासात घेतले नव्हते. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या नावाखाली संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डर्स लॉबीच्या घशात घालायला मी देणार नाही. हे मी खपवून घेणार नाही. याला माझा तीव्र विरोध असून येत्या अधिवेशनात मी हा मुद्दा मांडणार आहे. आमदार विजय सरदेसाईंची माहिती
कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापुर्वी मूर्तीला गंगेच्या पाण्याने स्नान केले जाते.
यानंतर मूर्ती व्यवस्थित स्वच्छ केली जाते.
मूर्तीला नवे आणि स्वच्छ कपडे परिधान केले जाते.
नंतर मूर्तीला स्वच्छ जागी ठेऊन चंदन लावले जाते.
यानंतर मंत्रांचे पठन केले जाते.
यानंतर प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानाची प्रक्रिया केली जाते.
यावेळी विधिवत पंचोपचाराने पुजा करण्यात येते.
नंतर आरती करून भाविकांमध्ये प्रसाद वाटला जातो.
गोडेगाळ उसगावजवळ जखमी रानडुक्कराला जीवदान. वन अधिकाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले.
समाजात तसेच घर-परिवारात विधवा महिलेला सर्वच बाबतीत दुय्यम स्थान दिले जाते. घरातील धार्मिक कार्यक्रमांपासून अशा महिलांना कायमच दूर ठेवले जाते. मात्र, पर्वरीतील उषा नाईक (५४) यांनी आपल्या मुलीच्या लग्नात तिच्या इच्छेसाठी समाजबंधने झुगारून देत तिचे कन्यादान केले. यासाठी उषा यांना त्यांच्या सासूबाई आणि परिवारानेही प्रोत्साहन दिले. त्यांनी दाखवलेल्या या धाडसामुळे समाजातील इतर विधवा महिलांनाही ऊर्जा मिळाली आहे.
गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 97.41
Panjim ₹ 97.41
South Goa ₹ 97.75
गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 89.97
Panjim ₹ 89.97
South Goa ₹ 90.29
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.