Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

Marathi News 18 November 2024: कॅश फॉर जॉब स्कॅम, सेंट झेवियर शव प्रदर्शन, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि गोव्यातील इतर महत्वाच्या घडामोडी मराठीमध्ये

Akshata Chhatre

'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

पोलिस महासंचालकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कुठेच 'क्लीन चीट' हा शब्द वापरलेला नाही. 'कॅश फॉर जॉब' प्रकरण संदर्भात पोलिस तपास सुरू तसेच कारवाई देखील होणार : मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

कॅश फॉर जॉब प्रकरणी संदीप परबला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

कॅश फॉर जॉब प्रकरणी संदीप परबला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार!

नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया करण्याची सुविधा पुढील वर्षापासून गोमेकॉत सुरु होणार. गोमंतकीयांना 10 लाखांपर्यंतच्या ब्रेन ट्यूमरच्या शस्त्रक्रिया मोफत मिळणार : गोमेकॉ डीन डॉ. शिवानंद बांदेकर

महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

माशेल येथे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र अज्ञात चोरट्याने हिसकावले. चोरट्याने दुचाकी घेऊन पळ काढला. या महिलेचे एकूण 1 लाख 40 हजारचे नुकसान झाले आहे आणि म्हार्दोळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

सांगे येथील नागरिकांनी बिरसा मुंडाच्या रॅलीला एका हजाराहून जास्त लोकांनी उपस्थिती दर्शवून रॅलीचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. महिलांनी देखील मोठ्या संख्येत उपस्थिती लावली आहे.

राज्य सरकारच्या सहकार पुरस्कारांची घोषण!

गोवा सहकार क्षेत्रात देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा. डॉ. दत्ताराम भास्कर देसाई यांना गोवा सहकार भूषण तर प्रतिमा धोंड यांना सहकार श्री पुरस्कार जाहीर. सहकार रत्न पुरस्काराला एकही नाव न आल्याने सहकार रत्न पुरस्कार यंदा दिला जाणार नाही. तसेच गौरी शिरवईकर आणि गोविंद नाईक यांना व्यक्तिगत पुरस्कार जाहीर झाला आहे.

पंतप्रधानांचा सुरक्षा प्रभारी असल्याची तोतयागिरी केल्याप्रकरणी शिरंग जावळ विरोधात तक्रार दाखल

पंतप्रधान कार्यालयात (PMO) सुरक्षा प्रभारी असल्याच्या आरोपावरून शिरंग मनेश जावळ याच्याविरुद्ध कळंगुट पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्यावर गोव्यातील टॅक्सी चालकांची खोटी बतावणी करून फसवणूक केल्याचा आरोप असून पुढील तपास सुरु आहे.

GMC मध्ये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये वाढ

गोवा मेडिकल कॉलेजमधल्या फिजिओथेरपीच्या जागांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि यानुसार आता फिजिओथेरपीच्या जागांमध्ये 100 टक्के वाढ करण्यात आली आहे.

तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

नेस्ले कंपनीजवळ रात्री 12:30 वाजताच्या सुमारास एक दुचाकी व कंटेनर यांचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला युवराज पाटील याच्या दोन्ही पायाला गंभीर जखम झाल्याने त्याला उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

फोंड्यात बाल विवाहाचा प्रकार उघडकीस

फोंडा पोलिसांनी गुरुवारी (15 नोव्हेंबर) रोजी उसगाव-तिस्क इथे झालेल्या बाल-विवाहामधून अल्पवयीन मुलीची सुटका केली. या प्रकरणामध्ये मुलीच्या वडिलांसह इतर चार जणांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

SCROLL FOR NEXT