गोवा

Goa News: बनावट आयकर प्रमाणपत्र, सिद्दीकी सुलेमानला अटक आणि गोव्यातील महत्वाच्या घडामोडी

Marathi Breaking News 16 December 2024: सनबर्न, सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हल यासह राज्यातील गुन्हे, राजकारण, पर्यटन क्षेत्रातील ठळक बातम्या.

Akshata Chhatre

फोंडा नगरपालीकेमध्ये बनावट आयकर प्रमाणपत्र सापडले; पोलीस तपास सुरु

फोंडा नगरपालीकामध्ये एक बनावट आयकर प्रमाणपत्र सापडले आहे. या संदर्भात पोलिस तक्रार नोंदवली असून पोलिस तपास सुरू आहे.

'ढगाला लागली कळ, पाणी...' मंत्री गोविंद गावडे यांचा व्हिडिओ व्हायरल!

सावंत सरकारमधील मंत्री गोविंद गावडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये ते प्रसिद्ध मराठी गाणं 'ढगाला लागली कळ, पाणी...' म्हणताना दिसत आहेत.

सिद्दीकी सुलेमानला अटक करणं आमचं प्राथमिक उद्दिष्ट: पोलिस महासंचालक आलोक कुमार

सिद्दीकी सुलेमानला अटक करणं हे आमचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यांची चौकशी केली जाईल, असे राज्याचे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले.

धारबांदोडा आरटीओ कार्यालयात इंटरनेट गुल्ल,लोकांची गैरसोय

धारबांदोडा येथील आरटीओ कार्यालयात गेले आठ दिवस इंटरनेट सेवा बंद असल्याने लोकांना वाहनांची व लाईसेंस प्रत काढण्यास मिळत नाही. संबंधित खात्याचे यावर दुर्लक्ष.

गोवा 'गँग्स ऑफ वासेपूर' बनत आहे

प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे. गोवा 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये बदलत आहे, असे काँग्रेस नेते सुनील कवठणकर यांनी म्हटले आहे.

कनिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची पदोन्नती

गोव्यातील एकूण ४३ कनिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना वरिष्ठ स्तरावर पदोन्नती मिळाली आहे.

जीवघेण्या अपघातात एकाने गमावले प्राण!

सावर्डे येथे झालेल्या भीषण अपघातात तरुणाला जीव गमवावा लागला. कुडचडे पोलिसांचा तपास सुरू असून अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT