अनुसूचित जमातींच्या राजकीय आरक्षणावर चर्चेसाठी विरोधी पक्षातील आमदार युरी आलेमाव, आल्टन डिकॉस्टा, वीरेश बोरकर, वेन्झी व्हिएगश क्रुझ सिल्वा यांनी लक्षवेधी आणली आहे. सभापतींनी लक्षवेधी मान्य केल्यास सोमवारी त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Mapusa Cyber Crime: म्हापसा नगरपालिका नगरसेवक स्वप्निल शिरोडकर यांच्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी इन्स्टाग्रामवर युजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.
पळसकट्टा-मोले येथे ट्रक व दुचाकीत झालेल्या अपघातात शिवकुमार सिंग (23 मध्य प्रदेश) याचा मृत्यू झाला असून, आशिष साहू हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार.
मार्रा- पिळर्ण येथील होरिझन्स आझुरा मधील एका व्हिलाचे मालक निम्स ढिल्लोन (77, मूळ पंजाब) यांचा संशयास्पद मृत्यू. याप्रकरणी खून आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मयतच्या अंगावरील सुवर्ण अलंकार आणि मोबाईल गायब असून दोघांना ताब्यात घेतले आहे. ढिल्लोन आदरातिथ्य व्यवस्थापन व्यवसायात होते. - पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन
महाराष्ट्र गोमन्तक पक्षाच्या राज्यातील सर्व समित्या विसर्जित. सर्व अधिकार केंद्रीय समितीला. कार्यकारिणीची मुदत संपल्याने घेतला निर्णय.
लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांना पाठिंबा देणार. कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नसून, पुनर्रचना केली जाईल असे पक्ष अध्यक्ष दीपक ढवळीकर यांचे आश्वासन.
मार्रा- पिळर्ण येथे होरिझनस् आझुरा येथील एका व्हिलाचे मालक निम्स ढिल्लोन (77, मूळ पंजाब) यांचा संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडला. ही घटना आज रविवारी सकाळी 8 च्या सुमारास उघडकीस आली.
याप्रकरणी मुंबईत स्थानिक पोलिसांनी चारचाकीसह एक महिला व पुरुषाला अडविले. दोघांना ताब्यात घेण्यास पर्वरी पोलिसांचे पथक मुंबईला रवाना.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कोंकणी राज्यभाषा दिनाच्या शुभेच्छा देत राजभाषेच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी त्वरित पावले उचलण्याचे सरकारला आवाहन केले आहे.
सर्व शासकीय भरतींमध्ये कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान अनिवार्य केले जावे आणि शासकीय राजपत्र कोंकणीमध्ये प्रकाशित केले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
कुर्टी खांडेपार ग्रामसभेत स्मशानभूमीचा विषय गाजला. पंचायतीने सुमारे 16 हजार चौरस मीटर जमीन हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजासाठी आरक्षित केली असून अजून त्याचे सीमांकन झाले नाही.
धार्मिक सलोख्यात तेढ निर्माण होवू नये यासाठी लवकरात लवकर तिन्ही स्मशान भूमींचे सीमांकन करण्याची मागणी ग्रामस्थांंनी केली.
मार्रा-पिळर्ण येथील होरीझन्स अझुरा व्हिलाच्या (Horizons Azura Villa) 77 वर्षीय मालकाचा काल (3 फेब्रुवारी) रात्री संशयित मृत्यू झाला. पर्वरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सर्वेश भंडारी या घटनेचा अधिक तपास करत असून पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे श्वानपथकासोबत घटनास्थळी दाखल.
अंगणवाडी शिक्षिकांना भाड्यापोटी पंचायतीकडून मिळणारे अर्थसहाय्य बंद केल्यामुळे कुर्टी खांडेपार ग्रामसभेत वादंग. शिक्षकांनी भाडे व जागा मालकाचा तपशील देवून अर्थसहाय्य मिळवण्याचे सरपंच व पंचायत सचिवांचे आवाहन.
गोव्यात 16 महिन्यात होणार कॅन्सर हॉस्पिटल. टाटा मेमोरियलसोबत करार. टाटा मेमोरियल यांच्या सल्ल्यानुसार बनतंय हॉस्पिटलचं डिझाईन. आरोग्य मंत्री विश्वजीत राणेंची आजच्या जागतिक कर्करोगदिनी माहिती.
शिलवाडा सावय येथील बागायतदार पद्मश्री संजय पाटलांचा वेरे वाघुर्मे ग्रामसभेत खास गौरव. पद्मश्री संजय पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेऊन गावाला स्वयंपूर्ण करण्याबाबत ग्रामसभेत ग्रामस्थांची मागणी
वेरे वाघुर्मे ग्रामसभेत शितोळे तळ्यावरील प्रस्तावित प्रकल्पाला लोकांचा विरोध कायम. पांडवकालीन गुंफा नष्ट करणाऱ्या कंत्राटदारावर एफआयआर नोंद करा, ग्रामस्थ आक्रमक. गावातील जलस्त्रोतांच्या सर्वेक्षणाची ग्रामस्थांची मागणी.
Phesgo कंपनीतर्फे बनवलेले स्तन कर्करोगाचे इंजेक्शन गोमेकॉत पहिल्या रुग्णाला देण्यात आले. या प्रति इंजेक्शनची किंमत 4.20 लाख असून गोमेकॉत दरवर्षी सुमारे 15 ते 20 रुग्णांना मोफत इंजेक्शन देण्याचे लक्ष्य आहे. स्तन कर्करोगावर मोफत इंजेक्शन देणारे गोवा हे पहिले राज्य आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
पैंगीण येथे विहीरीत पडलेल्या बिबट्याला वन कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. रात्री सावज हेरताना तो विहीरीत पडला. स्थानिकांनी यांची माहिती वनखात्याला देताच कर्मचाऱ्यानी पिंजरा विहीरीत टाकून बिबट्याला वाचवले. या बिबट्याची भोंडला अभयारण्यात रवानगी करण्यात येणार.
मडगाव पोलिस स्थानकाच्या कक्षेत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
यामधील महत्वाची बाब म्हणजे लैंगिक अत्याचार झाल्यानंतर त्यातून ही मुलगी गराेदर राहिल्याने हे प्रकरण उजेडात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.