Power Minister Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa News: 500 गिगावॉट हरित ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट गोवा 2029 पर्यंत पूर्ण कणार: वीजमंत्री ढवळीकर; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी

Goa News: गुन्हे, राजकारण, पर्यटन, कला - क्रीडा - संस्कृती यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ठळक घडामोडी.

Pramod Yadav

500 गिगावॉट हरित ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट गोवा 2029 पर्यंत पूर्ण कणारः वीजमंत्री ढवळीकर

भारत सरकारने 2030 पर्यंत निर्धारित केलेले 500 गिगावॉट हरित ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट गोवा 2029 पर्यंत पूर्ण कणार असल्याचे राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

कळंगुटमध्ये 65 हजार रुपयांच्या गांजासह एकाला अटक

कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाईत ०.६५० किलो गांजासह एकास अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव नंदा राम बी.के. (वय ३०, राहणार कळंगुट, मूळ गाव – नेपाळ) असे असून त्याच्याकडून अंदाजे ६५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

Goa Politics: मंत्री विश्वजीत राणेंचा झंझावाती मतदारसंघ दौरा

आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी केला झंझावाती मतदारसंघ दौरा. त्यांनी ब्रम्हाकरमळी,आंबेडे,उस्ते ह्या गावांना दिल्या भेटी दिल्या. अनेक विकासकामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसोबतही त्यांनी संवाद साधला.

Goa Drug Case: ड्रग्ज माफिया अटालाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

ड्रग्जप्रकरणी अंमलीपदार्थविरोधी पथकाने अटक केलेल्या कुप्रसिद्ध ड्रग्ज माफिया यानिव बेनाईम ऊर्फ अटाला याची म्हापसा न्यायालयानं आज न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर वास्तव्य केल्याचा गुन्हा हणजूण पोलिसांत दाखल झाल्याने त्याला चौकशीसाठी हणजूण पोलिस ताब्यात घेणार आहेत.

Goa Politics: राजीनाम्या संदर्भातील वृत्त खोटे, रवींचे स्पष्टीकरण

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि आपल्या भेटीत मी राजीनाम्याविशयी भाष्य केले असल्याचे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे. तसा कोणताच संवाद झालेला नाहीस असं स्पष्टीकरण मंत्री रवी नाईक यांनी दिलंय.

Tilari: कासारवर्णेत तिळारीच्या मुख्य कालव्यात आढळला गवा रेडा

कासारवर्णेतील खडी क्रशरजवळ तिळारीच्या मुख्य कालव्यात शुक्रवारी सकाळी गवा रेडा आढळून आला आहे.

खारफुटी क्षेत्राचे नुकसान किंवा अतिक्रमण विरोधात कडक कारवाई होणार; मंत्री विश्वजित राणे

गोव्याचा समुद्रकिनारे व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि आपली परिसंस्था समृद्ध होण्यासाठी खारफुटी आवश्यक आहे. सुमारे साडेतीन हजार खारफुटीशी संबंधित भागांचे सर्वेक्षण करून त्यांना संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या परिसंस्था पाण्याच्या प्रवाहाचे नियमन करतात, सागरी जीवसृष्टीला आधार देतात आणि धूप होऊ नये म्हणून त्याविरोधात कार्य करतात. त्यांच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलत असून कोणत्याही अतिक्रमण किंवा नुकसानीवर कडक कारवाई करू, असा इशारा मंत्री विश्वजित राणे यांनी दिला आहे.

Mapusa Fire: आंगड - म्हापसा येथे लागलेल्या आगीत सुपर मार्केट जळून खाक

आंगड - म्हापसा येथे वी केअर या सुपर मार्केटला लागेल्या आगीत मार्केट जळून खाक झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT