२०२५च्या जीएचआरडीसी लॉ स्कूल सर्वेक्षणात, मडगाव येथील व्हीव्हीएमच्या जी.आर.केअर कॉलेजला "टॉप आउटस्टँडिंग लॉ स्कूल्स ऑफ एक्सलन्स" तसेच "टॉप लॉ स्कूल इन गोवा" म्हणून घोषित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले प्रश्न खूप मोठे आहेत. आमच्यातील भांडणे ही किरकोळ. एकत्र येणं हे मोठं कठीण नाही. फक्त प्रश्न इच्छेचा आहे. राज ठाकरेंचे वक्तव्य. मीही किरकोळ भांडणे विसरण्यास तयार.फक्त माझ्यासोबत यायचं की गद्दारांसोबत ते एकदा ठरवा, उद्धव ठाकरेंच प्रत्युत्तर.
मांद्रे पंचायत क्षेत्रातील व्हीला संदर्भात दिलेली परवानगी मागे घ्यावी त्याची कार्यवाही करू नये. आमचा प्रकल्पाला विरोध निवेदन सरपंच राजेश मांद्रेकर यांना सादर
कोणतीही दलाली आम्ही खपवून घेणार नाही. रोजच्या रोज होणाऱ्या या दलाली करणाऱ्यांवर पर्यटक पोलिसांसह उत्तर जिल्हा पोलिस कारवाई करत आहेत. आतापर्यंत उत्तर आणि दक्षिणमध्ये 1000 लोक संशयित व्यक्ती आहेत, 193 सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे, 545 प्रकरणे कचरा फेकल्याबद्दल आणि 14 प्रकरणे समुद्रकिनार्यावर गाडी चालवल्याबद्दल दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर आम्ही शेखओनर्स बरोबर बैठक घेतली आहे अशी माहिती एसपी अक्षत कौशल यांनी दिली
खजणे, पेडणे येथे अल्पवयीन मुलीवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्रातील भेडशी येथून समीर कोरगावकरला अटक केली.
आंबेडे सत्तरीतील श्रवण बर्वे खून प्रकरणी ४३ वर्षीय स्थानिक वासुदेव नकूळ ओझरेकर ह्या इसमाला अटक. तपास अजून प्राथमीक स्थरावर सुरू. उत्तर गोवा अधिक्षक अक्षत कौशल यांची माहिती. सुत्रांच्या माहितीनुसार ह्या खून प्रकरणी आणखीनही धक्कादायक अटक होण्याची शक्यता.
धुमाशे येथील पुरातन वटवृक्षाला आग. शनिवारी सकाळची घटना. डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांकडून मदतकार्य.
नगरगाव येथील श्रवण बर्वे खून प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची सुटका केली असून, एकाची कसून चौकशी केली जात आहे.
भोम येथील मधलावाड्यावरील सुमारे ५० लोकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बायपासाठी भोममधील एकही घर किंवा मंदिराचा तुकडाही जाणार नाही. सोमवारी मंत्रालयात आपणास भेटा तांत्रिक पथकाकडून पूर्ण माहिती दिली जाणार. मुख्यमंत्र्यांचे भोमवासीयांना आश्वासन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.