Court X
गोवा

तन्वी वस्तला आणखी सहा दिवसांची पोलिस कोठडी, सडये शिवोलीत अतिक्रमण जमीनदोस्त; गोव्यातील ठळक बातम्या

Marathi Breaking News 24 December 2024: सुलेमान खान अटक, ख्रिसमस, नवीन वर्षाचे स्वागत, सनबर्न आणि गोव्यातील ठळक बातम्या

Akshata Chhatre

Cash For Job Scam; तन्वी वस्तला आणखी सहा दिवसांची पोलिस कोठडी

सरकारी नोकरीचे आमिष देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या तन्वी वस्तला आणखी सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. केपे कोर्टाने कोठडीत वाढ केल्याचा निर्णय दिला आहे. कुडचडे पोलिस याप्रकरणात अधिक तपास करत आहेत.

ट्रक - बाईकच्या अपघातात न्हावेली साखळीतील महिला जागीच ठार

न्हावेली साखळी येथे ट्रक व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात सुर्ल साखळी येथील महिला जागीच ठार. भुमीगत केबल्ससाठी खोदलेल्या रस्त्यामुळे अपघात घडल्याचा स्थानिकांचा दावा

गोवा काँग्रेसने शाह यांच्या आंबेडकरांवरील वक्तव्याचा निषेध केला; जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांच्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करत GPCC ने उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर केले.

आरोग्यमंत्र्यांनी घेतले संयमिंद्र तीर्थ स्वामीजींचे आशीर्वाद

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी बेंगळुरू येथील काशी मठ येथे प.पू.श्रीमद संयमिंद्र तीर्थ स्वामीजींचे आशीर्वाद घेतले.

शांतादुर्गा फातर्पेकारीण जत्रेत मुस्लिम विक्रेत्यांवर बंदी नाही

शांतादुर्गा फातर्पेकारीण देवस्थान समितीने जत्रेत मुस्लिम विक्रेत्यांवर बंदी घालण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. हे काही महाजन यांचे वैयक्तिक मत होते

म्हादई नदीशी संबंधित समस्यांवर पुढील बैठकीत चर्चा होणार

म्हादई नदीच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी पुढील बैठक २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता विधानसभा संकुल, पर्वरी येथे होणार आहे.

बेकायदेशीर अतिक्रमणे जमीनदोस्त!

पंचायत संचालनालयाच्या आदेशानंतर सडीये, शिवोली येथील रस्त्यालगतची बेकायदा अतिक्रमणे पंचायतीमार्फत पाडण्यात येत आहेत.

अमित पालेकर पुन्हा चौकशीसाठी दाखल

सुलेमान खान व्हिडीओ प्रकरणी गोवा आपचे अध्यक्ष अमित पालेकर पुन्हा एकदा चौकशीसाठी जुने गोवे पोलीस चौकीवर हजार झाले आहेत.

लोडेड ईव्ही कदंब बस म्हणजे धोकादायक

पणजीहून वास्कोला जाणारी कदंब ईव्ही बस ओव्हरलोडिंगमुळे धोकादायक ठरू शकते. ३५ आसनक्षम प्रवासी आणि १९ उभे राहण्याची क्षमता असलेली, बस ५० पेक्षा जास्त प्रवासी वाहून नेत आहे ज्यामुळे सुरक्षिततेला महत्त्वपूर्ण धोका निर्माण झालाय.

सुलेमानला ७ दिवसांची पोलीस कोठडी!!

सोमवारी संध्याकाळी गोव्यात आणलेल्या अट्टल आरोपी सुलेमान खानला दंडाधिकाऱ्यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

Ashok Gajapathi Raju: 17 वर्षे मंत्रिपद, 7 वेळा आमदार, एकदा खासदारकी भूषवलेले व्यक्तिमत्व; गोव्याचे 20 वे राज्यपाल अशोक गजपती राजू

SCROLL FOR NEXT