Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: सुलेमान खान प्रकरण आणि गोव्यातील ठळक बातम्या

Marathi Breaking 23 December 2024: पर्ये मंदिराचा वाद, बीफ ट्रेडर्स स्ट्राईक, सनबर्न यासह गोव्यातील ठळक बातम्या

Akshata Chhatre

सुलेमान प्रकरणातील टॅक्सी ड्रायव्हर हजरत अलीला सशर्त जामीन

सुलेमान उर्फ सिद्दीकी खानला हुबळीत टॅक्सीसेवा दिलेला ड्रायव्हर हजरत अलीला पणजी जेएमएफसी कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर.

आप कार्यकर्त्यांचा पोलीस स्थानकात 'रघुपती राघव'आणि 'हम होंगे कामयाब'चा गजर

सुलेमान खान प्रकरणात अमित पालेकर यांची तीन तासाहून जास्त वेळ चौकशी झाली. आप कार्यकर्त्यांनी याबाबत गोवा पोलीस स्थानकात जमून 'रघुपती राघव'आणि 'हम होंगे कामयाब'चा गजर केला.

अमित पालेकर यांची ३ तासांहून अधिक काळ चौकशी

सुलेमान खान प्रकरणात जुने गोवा पोलिस अमित पालेकर यांची गेल्या ३ तासांहून अधिक काळ चौकशी करत आहेत.

कार फेरीतून बाहेर काढताना कलंडली!

ओल्ड गोवा फेरी धक्क्याजावळ कार फेरीतून बाहेर काढताना कलंडली. सुदैवाने जीवितहानी नाही.

सुलेमानचा नवीन व्हिडिओ व्हायरल; आरोपी सरकारच्या संपर्कात आहे : वेंझी व्हिएगस

अमित पालेकरची चौकशी सुरू असतानाच सिद्दीकी उर्फ ​​सुलेमान खानचा नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून आरोपी सरकारच्या संपर्कात असल्याचे सिद्ध होते असे विधान आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केले आहे.

सुलेमानला अटक; मुख्यमंत्री सावंतांची माहिती

सुलेमानला गोवा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी केरळमधून अटक केली असून आज त्याला गोव्यात परत आणण्यात येणार आहे: मुख्यमंत्री सावंतांची माहिती.

वाजपेयींच्या जयंतीनिमित्त देशभरात सुशासन दिन

माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती 25 डिसेंबर हा दिवस देशभरात सुशासन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्तने देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .25 डिसेंबर रोजी गोव्यात सुध्दा वेगवेगळ्या बुतांवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती दामोदर नाईक यांनी दिली

सुलेमान खान व्हायरल व्हिडिओ चौकशीसाठी ॲड अमित पालेकर पोलीस स्थानकात दाखल

फरारी सुलेमान खान व्हायरल व्हिडिओ प्रकरणाच्या संदर्भात चौकशीसाठी पीएससमोर हजर राहण्याचे आदेश मिळाल्याने आपचे अध्यक्ष ॲड अमित पालेकर जुने गोवा पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.

अवैध कत्तलखाना चालविल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पर्वरी पोलिसांनी बार्देस येथे अवैध कत्तलखाना चालविल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cabinet Decision: 'इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी'ची पुनर्रचना, राज्यस्तरीय शहरी विकास संस्थेला मंजुरी... मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय

NZ ODI Squad vs India: टीम इंडियाविरुद्ध भिडण्यासाठी न्यूझीलंड सज्ज! फिन अ‍ॅलन, लॉकी फर्ग्युसनसह अनेक खेळाडूंचं कमबॅक, पाहा संपूर्ण संघ

Government Job Fraud: दोषींची मालमत्ता जप्त करणार! तोतया आयुक्तप्रकरणी CM सावंत यांचे कडक कारवाईचे संकेत

America Mass Shooting: अमेरिकेत गोळीबाराची धक्कादायक घटना! 2 चिमुकले आणि 8 महिन्यांची गर्भवती महिला यांच्यासह 9 जणांचा मृत्यू VIDEO

Horoscope: शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस ठरणार खास! देवीच्या कृपेनं 'या' राशींच्या आयुष्यात येणार यश, धनलाभाच्या संधीही मिळणार

SCROLL FOR NEXT