गोवा

Goa News: सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खननादरम्यान महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Latest Marathi News 17 November 2024: कॅश फॉर जॉब स्कॅम, इफ्फी, सेंट फ्रान्सिस झेवियर शव प्रदर्शन सोहळा यासह राज्यातील इतर ठळक बातम्या.

Akshata Chhatre

सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन, एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

म्हादई नदीत बेकायदेशीर रेती उत्खनन करत असताना एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू. सुवर्णा दामोदर गावकर असे मृत महिलेचे नाव.

पारंपारिक लग्न सोहळा, सत्तरीतील 'ह्या' दोघांनी दिला मोठा सामाजीक संदेश

सत्तरी तालुक्यातील दोन युवा पर्यावरणवादी विठ्ठल शेळके आणि वनिता वरक यांनी आधुनिक गोष्टींना फाटा देत पारंपारीक लग्न केले. वडाच्या झाडाखाली धनगरी वेषात लग्न सोहळा पार पडला . विठ्ठल आणि वनिता पर्यावरण अभ्यासक, कार्यकर्ते प्रा.राजेंद्र केरकरांचे शिष्य आहेत.

संस्कृती मापारीची जीसीए संघामध्ये निवड!

संस्कृती निलेश मापारी (सकोर्डा, धारबांदोडा) हिची 15 वर्षांखालील गोवा क्रिकेट असोसिएशन संघामध्ये फलंदाज म्हणून निवड.

151 जयंती अगोदर गोव्यात बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारला जावा

बिरसा मुंडा रॅलीचा आज तिसरा दिवस आणि आज सावर्डे मतदार संघात ही रॅली पूजली आहे. बिरसा मुंडांची वेशभूषा करून एका तरुण मुलाने सरकारकडे मागणी केली आहे की बिरसा मुंडा यांचा गोव्यात एकही पुतळा नसल्याने पुढच्या 151 जयंती अगोदर गोव्यात त्यांचा पुतळा उभारला जावा.

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांची Job Scam वर रोखठोक प्रतिक्रिया

"पोलिस विभागाने योग्य तपासाशिवाय कोणालाही प्रमाणपत्र देऊ नये. एजंटांना अटक करण्यात आली असली तरी राजकीय सहभागाशिवाय हे शक्य झालेले नाही. माझ्या कार्यकाळात असे काही प्रकरण सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडले असते. हा घोटाळा म्हणजे तरुण पिढीवर होणारा अन्याय आहे."

चोडण लोकवस्तीजवळ भयंकर मगरीला पकडले

लोकवस्तीजवळ वन खाते आणि डिचोली अग्निशमन दलाने मगरीला पकडले आहे. शनिवारी (दि.16 नोव्हेंबर) रोजी रात्री त्यांनी ही कामगिरी बजावली. काराभाट-चोडण येथे मगरीने कुत्र्याला फस्त केले होते.

आमदार जीत आरोलकरांच्या हस्ते केरीत कामांचा शुभारंभ

केरी पंचायत क्षेत्रात विविध कामांचा आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT