गोवा

Goa News: सिद्धेश खांडेपारकर यांना रक्षामंत्री बहादूर पुरस्कार तर अर्मांडो कुलासो गोव्याचे द्रोणाचार्य

Marathi Breaking News 17 December 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी

Akshata Chhatre

सिद्धेश खांडेपारकर यांना रक्षामंत्री बहादूर पुरस्कार प्रदान!

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते गोवा राज्यातील शिगाव येथील तुळशीदास उर्फ सिद्धेश राजाराम खांडेपारकर यांना रक्षामंत्री बहादूर पुरस्कार प्रदान.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी गोव्यातून तीन मतदारांची नेमणूक

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी गोव्यातून भाजपतर्फे दिलिप परुळेकर, वासुदेव मेंग गावकर व सुवर्णा तेंडुलकर या तीन मतदारांची नेमणूक.

रामनगर,बेती येथे दोन नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन

रामनगर,बेती येथे दोन नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन झाले. साळगावचे आमदार केदार नाईक यांच्या हस्ते बेती येथील रामनगर, प्रभाग क्रमांक १०, येथे दोन नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे परिसरातील वीज पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली. प्रकल्पाची एकूण किंमत अनुक्रमे २२ लाख आणि २२४ लाख रुपये आहे.

मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक यांचे देवस्थानाला योगदान

मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत (बाळा) नाईक, विद्यामान पंच सदस्य यांनी सातेरी मंदिर गावडेवाडा येथे ॲल्युमिनियम ग्रीलचे काम स्वखर्चाने केले.

यापुढे अभियांत्रिकी महाविद्यालयात जागा रिक्त राहणार नाहीत : मुख्यमंत्री

एक काळ असा होता की अभियांत्रिकी महाविद्यालयात ५० टक्के जागा रिक्त राहायच्या. मी हमी देतो की पुढील 2 वर्षांच्या आत, कोडिंग आणि रोबोटिक्स योजनेनंतर जागा यापुढे रिक्त राहणार नाहीत.: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्याचे अर्मांडो कुलासो द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित

गोव्याचे प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक अर्मांडो कुलासो यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्पोर्ट्स कोचिंगमध्ये हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले गोव्यातील व्यक्ती आहेत.

पिळगाव पंचायतीच्या सरपंचपदी शर्मिला वालावलकर बिनविरोध

पिळगाव पंचायतीच्या सरपंचपदी शर्मिला वालावलकर. शुक्रवारी झालेल्या बैठकीत सौ. वालावलकरांची झाली बिनविरोध निवड. खनिजप्रश्नी गावाबरोबर राहण्याची ग्वाही.

साखळीत रविवारी मराठी राजभाषा साहित्य संमेलन

मराठी आमची मायबोली व गोमंतक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने साखळी येथील श्री राधाकृष्ण मुरलीधर संस्थानात रविवारी दि. १९ जाने. रोजी मराठी राजभाषा साहित्य संमेलना २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

१३ वा वार्षिक आदिवासी महोत्सव १८ आणि १९ जानेवारी रोजी संपन्न होणार

१३ वा वार्षिक आदिवासी महोत्सव १८ आणि १९ जानेवारी आदिवासी संगठना केपे आयोजित १३ वा वार्षिक आदिवासी महोत्सव १८ आणि १९ जानेवारी रोजी कोपलेभट देवो केपे येथे होणार आहे. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

पेडणेचे माजी आमदार परशुराम कोटकर यांचे हॉस्पिटलमध्ये निधन

परशुराम कोटकरांचे मगो पक्षासाठी खूप मोठे योगदान होते. एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या घरच्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळो - सुदीन ढवळीकर, मगोचे ज्येष्ठ नेते तथा वीज मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Blast: 5 साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली 'दिल्ली', हायकोर्टाबाहेर रक्ताचे पाट; 2005 च्या स्फोटात 60 हून अधिकांचा मृत्यू VIDEO

Delhi Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये मोठा स्फोट, 9 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती; VIDEO

Election Commission: 'एच-फाईल्स'चा फुगा फुटला? निवडणूक आयोगाने फेटाळले राहुल गांधींचे आरोप; म्हणाले, 'प्रतिज्ञापत्र द्या, नाहीतर...'

Jawaharlal Nehru Stadium: क्रीडाप्रेमींना धक्का! दिल्लीतील ऐतिहासिक जवाहरलाल नेहरू स्टेडियम पाडलं जाणार, कारण काय?

Dharmendra Net Worth : लोणावळ्यात आलिशान फार्महाउस, लक्झरी कार... सनी-बॉबीपेक्षा कितीतरी पटीने संपत्ती जास्त; धर्मेंद्र यांची नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT