Goa Airport Dainik Gomantak
गोवा

Goa Airport: विमानतळांवर किरकोळ मद्यविक्रीला विरोध

Goa Liquor Traders Association: विमानतळावर किरकोळ मद्य विक्रीच्या दुकानाला परवाने दिल्यावर मोठे नुकसान सोसावे लागले होते

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: दाबोळी व मोपा विमानतळावर २४ तास पॅकबंद मद्याच्या बाटल्यांची किरकोळ विक्री सुरू करण्यास दुकानाला परवानगी देण्यास गोवा मद्य व्यापारी संघटनेने विरोध केला आहे.

मोपा विमानतळावर मुंबईतील एका मद्य व्यापाऱ्याला गोवा सरकारकडून परवाना दिला जाणार असल्याची माहिती संघटनेला मिळाली आहे. त्याला परवाना दिल्यास गोव्यातील मद्य व्यापाऱ्यांवर अन्याय होणार आहे व त्याचा वाईट परिणाम व्यवसायावरही होणार आहे.

यापूर्वीही दाबोळी विमानतळावर किरकोळ मद्य विक्रीच्या दुकानाला परवाने दिल्यावर मोठे नुकसान सोसावे लागले होते. तेव्हा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या विमानतळावर दिलेला परवानाच रद्द केला होता, अशी माहिती संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT