Goa Rain Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: डिसेंबरमध्येही गोव्यात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Goa Rain Alert: दोन्ही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावासाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Goa Rain Alert

पणजी: पावसाळा संपून एक महिना उलटला तरी आता डिसेंबरमध्ये देखील गोव्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. डिसेंबरच्या पहिल्या चार दिवशी दोन्ही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. गोवा हवामान खात्याच्या वेधशाळाने (Goa IMD) याबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

IMD Goa

हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार डिसेंबर १ ते ३ या काळात राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. तर ४, ५ आणि ६ डिसेंबर रोजी राज्यातील दोन्ही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावासाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान कोरडे आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली. दरम्यान, ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या काळात राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे.

गोवा हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार ४ ते ६ डिसेंबर या काळात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यत आहे. राज्यात सध्या सकाळच्या सत्रात जाणवणारी हलकी थंडी वगळता दिवसभर उकाड्याने बुरे हाल होतायेत. दरम्यान, पावासामुळे गर्मीपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Ganpati Special Bus: बाप्पा पावला... गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता, ST च्या 5000 ज्यादा बसेस धावणार

Ro-Ro Ferry in Goa: 56 गाड्या, 100 प्रवासी, AC केबिन, 5 मिनिटांत करा रायबंदर ते चोडण प्रवास; प्रवाशांना मोजावे लागणार 'एवढे' पैसे Video Viral

Glowing Trees Goa: अद्भुत! गर्द काळोखात, गोव्याच्या घनदाट जंगलात 'चमकणारी झाडे'

Congress: काँग्रेसच्या यशात 'संविधान वाचवा'चा वाटा, पण डॉ. आंबेडकरांशी असलेले तणावपूर्ण संबंध विसरता येईल का?

Tesla Showroom In Mumbai: इलॉन मस्कच्या 'टेस्ला' कंपनीचं मुंबईत जय महाराष्ट्र! वांद्रे-कुर्ला संकुलात भारतातलं पहिलं शो रूम सुरू

SCROLL FOR NEXT