Goa Leopard attack on Dog  Dainik Gomantak
गोवा

Goa Leopard: मायणे निरंकाल येथे बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला, कुत्र्याचा कान तुटला; आठवड्यातील दुसरी घटना

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; रात्री गावात घराबाहेर पडणे मुश्किल

Akshay Nirmale

Goa Leopard Attack on Dog: गोव्यातील मायणे निरंकाल या गावात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. नुकतेच येथील एका ग्रामस्थाच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता. यावेळी बिबट्याची कुत्र्याशी झटापट झाली होती.

या झटापटीने संबंधित कुत्र्याचा मालक प्रल्हाद सत्तरकर यांना जाग आली. त्यांनी लाईट लावल्यानंतर बिबट्या कुत्र्याला सोडून पसार झाला.

या घटनेनंतर गावात दहशत परसली असून आता पाळीव कुत्र्यांना देखील घराबाहेर न ठेवता ग्रामस्थ घरात घेऊन झोपत आहेत. बिबट्याच्या भीतीने गावात रात्री फिरणे मुश्किल झाले आहे.

कुत्र्यावरील हल्ल्याच्या या घटनेनंतर हा प्रकार वनविभागाच्या कानावर घालण्यात आला होता. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी दोन ते तीन दिवस येऊन गेले. खरे तर काही दिवसांपुर्वीच आणखी कुत्र्यावर बिबट्याने झडप घातली आहे.

आठवड्याच्या काळात दोन घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आहे. त्यांना रात्री-अपरात्री जीव मुठित घेऊन प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांकडून या वनविभागाकडे या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT