Leopard attack Dainik Gomantak
गोवा

Leopard Attack Curti, Goa: म्हाळसे-कुर्टीत शेळीवर बिबट्याचा दिवसाढवळ्या हल्ला; ग्रामस्थांमध्ये दहशत

Leopard Attack Curti, Goa: घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी पिंजरा लावलाय.

Ganeshprasad Gogate

Leopard Attack Curti, Goa: बिबट्याने दिवसाढवळ्या शेळीवर हल्ला केल्याची घटना म्हाळसे, कुर्टी-फोंडा येथे घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी पिंजरा लावला असून दिवसा-ढवळ्या झालेल्या या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या अगोदर या भागात बिबट्याचा संचार असल्याचा घटना घडल्या होत्या मात्र दिवसाढवळ्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याची ही पहिलीच घटना असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

काही दिवसांपूर्वी चंदेल हसपूर भागात बिबट्याने अशाच प्रकारे हल्ला केला होता. बिबट्याने गेले अनेक दिवस या भागात धुमाकूळ घालत गोठ्यातील गुरांना आपले लक्ष्य केले होते.

कुंभारवाडा येथील भरत भाईप यांच्या गुरांच्या गोठ्यात जाऊन गाईच्या वासराला हल्ला केला.

सुदैवाने त्याच दरम्यान घरातील मंडळी जाग आली आणि ते उठल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर सदर बिबट्या पळून गेला. मात्र वारंवार अशा घटना घडू लागल्याने रानटी प्राण्यांचा जंगल अधिवास संपत आल्याचे यातून स्पष्ट होतंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT