Goa University LLB  Dainik Gomantak
गोवा

LLB Admission Scam: प्राचार्यांसह ग्रंथपाल निलंबित; बार कौन्सिलकडून विद्यार्थ्यांना दिलासा, प्रवेशाच्या 30 जागा...

बीए-एलएलबी प्रवेश घोटाळा : विद्यापीठ निर्देशानुसार कारवाई, विद्यार्थ्यांना दिलासा : पुन्हा परीक्षा नाहीच; लवकरच शिक्कामोर्तब

गोमन्तक डिजिटल टीम

LLB Admission Scam बीए-एलएलबी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार, हे आता नक्की झाले आहे. यावर्षी या अभ्यासक्रमासाठी तीस जागा वाढविण्यास केंद्रीय बार कौन्सिलने परवानगी दिली असून त्यामुळे वंचित विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश मिळणे शक्य होणार आहे.

त्यामुळे गोवा विद्यापीठ फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. तथापि, या प्रक्रियेत घोळ घालणारे कारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साबा दा सिल्वा आणि ग्रंथपाल आनंद साळवे या दोघांना महाविद्यालय व्यवस्थापनाने निलंबित केले असून त्यांच्या विरोधात शिस्तभंग कारवाईसाठी सुनावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या परीक्षा प्रक्रियेत घोळ घातल्याचे सिद्ध झाल्यावर गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाने सर्व प्रवेश प्रक्रिया रद्द करून नव्याने फेर प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार विद्यापीठाने आदेशही जारी केला होता. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या १८० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले होते.

यावर तोडगा म्हणून शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी बार कौन्सिलकडे अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते.

खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बार कौन्सिलने ही मागणी मान्य केली असून साळगावकर विधी महाविद्यालयात २०, तर कारे कायदा महाविद्यालयात १० जागा वाढविण्यास परवानगी दिली आहे.

या फेर प्रवेश परीक्षा घेण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी उच्च न्यायालयात गेले असून सोमवारी हे प्रकरण सुनावणीस येणार आहे.

त्यावेळी विद्यापीठ आपले नवीन परिपत्रक मागे घेण्याची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सोमवारी विधानसभेत घोषणा करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता पुढे काय?

  • पुन्‍हा प्रवेश परीक्षा घ्‍यावी, असे विद्यापीठाने निर्देश दिल्‍याने विद्यार्थ्यांनी खंडपीठात धाव घेतली आहे.

  • मात्र, बार कौन्‍सिलने कारे आणि साळगावकर विधी महाविद्यालयांत यंदा प्रथमवर्ष प्रवेशासाठी वाढीव ३० जागांना मान्‍यता दिली आहे.

  • त्‍यानुसार साळगावकर विधी महाविद्यालयात २०, तर कारे कायदा महाविद्यालयात १० जागा वाढविण्यात येणार आहेत.

  • जुन्‍या पद्धतीप्रमाणे ५० टक्‍के बारावीचे गुण आणि ५० टक्‍के प्रवेश परीक्षेचे गुण विचारात घेऊन नवी प्रवेश यादी तयार केली जाईल.

  • जे यादीबाहेर राहतील, त्‍यांना वाढीव जागांमध्‍ये सामावले जाईल.

  • सोमवारी खंडपीठातील सुनावणीअंती या सर्व प्रक्रियांवर शिक्‍कामोर्तब होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT