Goa Land Scam Case

 

Dainik Gomantak 

गोवा

राज्यातील 'जमीन घोटाळा' प्रकरणात आणखीन एक भर..

बोगस कागदपत्रांच्या आधारे आपल्या जमिनीचा मालकी हक्क बदल्याचा आरोप..

Shreya Dewalkar

पणजी: राज्यात अनेक जमीन घोटाळ्याची प्रकरणे (Goa Land Scam) गाजत असतानाच कामुर्ली-बार्देश येथील जमीन बळकवल्याचा प्रकार उघडकीस अला आहे. ही जमीन सुमारे चार लाख चौरसमीटर असून, सदर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकवण्यात आली आहे. संबंधित प्रकरणामध्ये मुंबई येथील ब्रुनो नोरोन्हा या संशयिताविरुद्ध क्राईम ब्रँचमध्ये (Crime Branch) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही घटना 2013-14 या साली घडली असून घटने संबंधित मामलेदार, सरकारी अधिकारी चौकशीच्या घेर्‍यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑनलाईन 1/14 चा उतरा तपासला असता यामध्ये मूळ मालकाचे रेकॉर्ड वरील नाव नसल्याचे आढळून आले होते.

एरोल सिल्वा पिंटो या दांपत्याच्या नावे असलेली ही जमीन बोगस कागदपत्रांच्या आधारे आपल्या जमिनीचा (Land Scam) मालकी हक्क बदल्याचा आरोप एरोल सिल्वा पिंटो यांनी केला आहे. एरोल सिल्वा पिंटो हे चेंबूर येथे स्थायिक असून, त्यांनी या प्रकरणाची तक्रार क्राईम ब्रँचकडे केली आहे. संबंधित प्रकरणाची दाखल घेत क्राईम ब्रँचने थेट कारवाई केली आहे. या प्रकरणात ब्रुनो नोरोन्हा आणि संबंधितांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT