High Court land mapping order Dainik Gomantak
गोवा

Goa Land Misuse: जमीन दिली शेतीसाठी, प्रत्‍यक्षात उभारली व्‍यावसायिक आस्‍थापने! ‘जमीन महसूल’च्‍या कलम 18 ‘क’चा 8 जणांकडून गैरवापर

Goa Agricultural Land: गोवा जमीन महसूल कायद्याच्‍या कलम १८ ‘क’अंतर्गत सार्वजनिक प्रकल्पांमुळे जमिनी गेलेल्‍यांना सरकारकडून देण्‍यात येणाऱ्या इतर जमिनींवर केवळ शेतीच करण्‍याची अट आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Illegal Land Use : गोवा जमीन महसूल कायद्याच्‍या कलम १८ ‘क’अंतर्गत सार्वजनिक प्रकल्पांमुळे जमिनी गेलेल्‍यांना सरकारकडून देण्‍यात येणाऱ्या इतर जमिनींवर केवळ शेतीच करण्‍याची अट आहे.

परंतु, अशा नऊ ठिकाणच्‍या जमिनींचे हस्‍तांतरण झाले असून, तेथे व्‍यावसायिक आस्‍थापने उभारण्‍यात आली आहेत. यातील काही प्रकरणांची चौकशी सुरू असून, काहींवर कारवाईही करण्‍यात आली आहे.

आमदार विजय सरदेसाई यांच्‍या लेखी प्रश्‍‍नाला महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात यांनी दिलेल्‍या उत्तरातून ही बाब समोर आलेली आहे. सरकारी प्रकल्‍पांसाठी ज्‍यांच्‍या जमिनी घ्‍याव्‍या लागतात, त्‍यांना इतर ठिकाणी जमिनी देताना सरकारकडून जमीन महसूल कायद्याच्‍या कलम १८ ‘क’चा वापर केला जातो.

या कलमाअंतर्गत अशा जमिनींचे संबंधितांना हस्‍तांतरण करता येत नाही. किंबहुना त्‍या जमिनींवर केवळ शेतीच करण्‍याची अट असते. तरीही नऊ ठिकाणच्‍या जमिनींचा गैरवापर करण्‍यात आल्‍याचे मंत्री मोन्‍सेरात यांनी म्‍हटले आहे. यातील हिमांशू मल्‍होत्रा यांचे गोया नाईट क्‍लब हे आस्‍थापन ११ डिसेंबर २०२५ रोजी सील करण्‍यात आले आहे, असेही त्‍यांनी नमूद केले आहे.

दरम्‍यान, कलम १८ ‘क’ अंतर्गत खरेदी केलेल्या मालमत्तांमध्ये टेकडीचे उत्खनन वा भराव टाकल्‍याबाबत किती तक्रारी दाखल झाल्‍या आहेत? असाही आमदार सरदेसाई यांनी विचारला होता. त्‍यावर अशाप्रकारच्‍या १७ तक्रारी खात्‍याला प्राप्‍त झाल्‍या असल्‍याचेही मंत्री मोन्‍सेरात यांनी म्‍हटले आहे.

कुणी कुठे उभारली व्‍यावसायिक आस्‍थापने

ठिकाण सर्वे क्रमांक नाव

मोरजी ९४/२२ बाबी बागकर

अंबेरे १६/२ उदय गडेकर

अंबेरे १६/१ चिंतामणी तळवणेकर

विर्नोडा ४८/४ सहदेव परब/सीताराम परब

हणजुणे ४१०/१ गोया नाईट क्‍लब (मालक हिमांशू मल्‍होत्रा)

केळशी ६४/५ गो ग्रीन स्‍पाईस इको रिसॉर्ट

सेर्नाभाटी १२/४ फुर्तादो बीच हाऊस

कोलवा ६५/११ इपिफानिओ व्‍हिन्‍सेंट ग्रासियस

कोलवा ६४/३६ इपिफानिओ व्‍हिन्‍सेंट ग्रासियस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NH66 Highway Goa: राष्ट्रीय महामार्ग 66 बाबत नवीन अपडेट! रुंदीकरणाचे काम होणार सुरु; 764 कोटी मंजूर

Terror Attack: 'या' इस्लामिक देशात नरसंहार! 31 निष्पाप नागरिकांची गोळ्या झाडून हत्या; लष्करी राजवटीत हिंसाचाराचा उद्रेक

Goa Russian Murder: एकाच नावाच्या दोन रशियन महिलांची का केली हत्या? मारेकऱ्याच्या आईशी कनेक्शन! खुनाचं गुढ उकललं!

Goa Accident: मद्यधुंद कारचालकाने दिली मांडवी पुलावर धडक! तिघे जखमी, एकाचा मृत्यू; संशयिताविरुध्द सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्‍चित

"पांडुरंग हरी"! गोव्यात पहिल्यांदाच होणार विठ्ठल रखुमाई शाही विवाह सोहळा; म्हापशातील देवस्थानात रंगणार शतकोत्सव कार्यक्रम

SCROLL FOR NEXT