Suleman Siddiquie Dainik Gomantak
गोवा

Suleman Siddiquie: जमीन हडप प्रकरणी सुलेमानला पुन्हा आणले गोव्यात! न्यायालयाचे निर्देश; 8 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी

Goa Land Grab Scam: गोव्यातील बहुचर्चित जमीन हडप आणि मालमत्ता फसवणूक प्रकरणातला मुख्य आरोपी सुलेमान सिद्दीकी याला अखेर गोव्यात परत आणण्यात आले.

Manish Jadhav

Goa Land Grab Scam: गोव्यातील बहुचर्चित जमीन हडप आणि मालमत्ता फसवणूक प्रकरणातला मुख्य आरोपी सुलेमान सिद्दीकी याला अखेर गोव्यात परत आणण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) न्यायालयात हजर राहण्यास तो वारंवार अपयशी ठरत असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) रवानगी केली. सुलेमान हा जमीन हडप प्रकरणांमध्ये मुख्य आरोपींपैकी एक आहे.

वारंवार गैरहजर, त्यामुळे कारवाई

मागील महिन्यात सुलेमान सिद्दीकीला दिल्ली पोलिसांनी एका वेगळ्या प्रकरणात चौकशीसाठी दिल्लीला नेले होते. तेव्हापासून तो गोव्यातील (Goa) न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहत होता. मात्र, अनेक वेळा तो तांत्रिक अडचणींमुळे किंवा इतर कारणांमुळे हजर राहू शकला नाही.

न्यायालयाने त्याची वारंवार होणारी अनुपस्थिती (Non-Appearance) आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला प्रत्यक्ष गोव्यात आणण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानंतर त्याला गोव्यात आणण्यात आले आणि न्यायालयात हजर करण्यात आले.

पुढील सुनावणी 8 ऑक्टोबर रोजी

सुलेमानला न्यायालयात हजर केल्यानंतर, न्यायालयाने (Court) त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली, त्यामुळे आता पुढील आदेशापर्यंत त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. दरम्यान, सुलेमानने दाखल केलेल्या जामीन अर्जावर न्यायालयात 8 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत त्याला जामीन मिळतो की, कोठडीची मुदत वाढते, याकडे गोवा पोलिसांचे आणि जमीन हडप प्रकरणातील पीडितांचे लक्ष लागून राहिले आहे.

गोवा जमीन घोटाळा प्रकरण

गोवा सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडून (SIT) राज्यात सुरु जमीन हडप घोटाळ्याचा तपास केला जात आहे. सुलेमान सिद्दीकी हा या घोटाळ्यातील अनेक प्रकरणांचा प्रमुख दुवा मानला जातो. त्याला गोव्यात परत आणल्यामुळे तपास पथकाला (SIT) या प्रकरणातील अधिक माहिती आणि सहआरोपींची माहिती मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या तपासाला आता अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs: पर्यटकांवर हल्ला, वाढती संख्या; गोव्यात 'भटक्या कुत्र्यांच्या' समस्येबाबत होणार चर्चा, मुख्‍य सचिव घेणार अधिकाऱ्यांची बैठक

Pooja Naik: 'पूजा'कडून पैसे घेणारे मंत्री, IAS अधिकारी, अभियंता कोण? ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरण पेटणार; मुख्‍यमंत्र्यांनी दिली तपासाची हमी

Tragic Death: कार कोसळली कालव्यात, युवक गेला वाहून; अस्नोडा येथे दुर्दैवी घटनेत एकाचा मृत्यू Watch Video

Kaalbhairav Jayanti 2025: कोण सर्वश्रेष्ठ? ऋग्वेदाचे उत्तर ऐकून ब्रम्हदेव हसले, भगवान शंकरानी धड वेगळे केले; कालभैरवाच्या अवताराची कथा

Horoscope: जुनी कामे पूर्ण करण्याची संधी, चांगला निर्णय भविष्याचा मार्ग बदलणार; जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य

SCROLL FOR NEXT