Goa Land Grab Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Land Grab Scam: जमिन हडप प्रकरणांची चौकशी पूर्ण; 200 हून अधिक याचिका, 100 हून अधिक मालमत्तांची तपासणी...

महिनाअखेर किंवा नोव्हेंबरच्या सुरवातील माजी न्यायमूर्ती व्ही. के. जाधव अहवाल सरकारला देणार

Akshay Nirmale

Goa Land Grab Scam: गोव्यातील विविध ठिकाणच्या जमिनी हडपण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. के. जाधव यांचा एक सदस्यीय आयोग नेमण्यात आला होता.

हा आयोग याच महिन्यात म्हणजे, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. जाधव यांनीच ही माहिती दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या अहवालात जमीन बळकावण्याच्या सर्व प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित करण्यासह सरकार अशा घटनांची पुनरावृत्ती होण्यापासून कशी रोखू शकते याची शिफारस करणे अपेक्षित आहे.

आयोगाने जमीन हडप प्रकरणांची चौकशी जवळपास पूर्ण केली आहे. माजी न्यायमूर्ती जाधव त्यांचा अहवाल ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकारला सादर करतील.

अहवाल सरकारला सादर केल्यानंतर त्यातील शिफारशी राज्याच्या विधानसभेसमोर मान्यतेसाठी ठेवल्या जातील. विधानसभेने अहवाल स्वीकारल्यानंतर सरकार आयोगाच्या शिफारशी लागू करेल.

जानेवारीमध्ये या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी एक सदस्यीय आयोग कार्यान्वित झाला. जाधव यांनी जमीन हडप प्रकरणांचा भाग असलेल्या 10 स्थळांची पाहणी केली होती आणि प्रकरणांची सुनावणी घेतली होती.

जमीन हडप प्रकरणांचा तपास करणाऱ्या एसआयटीनेही आयोगाला कागदपत्रे सादर केली आहेत. जमीन बळकावण्यासंदर्भात 200 हून अधिक याचिका प्राप्त झालेल्या या टीमने राज्यभरात पसरलेल्या 100 हून अधिक मालमत्तांची चौकशी केली आहे.

सरकारी कर्मचार्‍यांसह अनेकांना यापूर्वीच अटक केली आहे आणि अनेक एफआयआर नोंदवले आहेत. बार्देश तालुक्यात सर्वाधिक जमीन बळकावल्याची प्रकरणे समोर आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 10 रुपयांच्या अंड्याला लागली 'इतक्या' हजारांची बोली! इराणमधील युद्धग्रस्तांसाठी लडाखी जनतेचा मदतीचा हात; व्हिडिओ व्हायरल

Horoscope April 2026: 14 एप्रिलनंतर पालटणार 'या' राशीचं नशीब! गुरु आणि सूर्याच्या साथीमुळे कष्टाला मिळणार फळ; उत्पन्नाची दारे होणार खुली

US Israel Iran War: इस्रायल-अमेरिका हल्ल्यात इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू; युद्धविरामाच्या प्रस्तावादरम्यान संघर्षाचा भडका

US Iran War: इराणच्या वाळवंटात स्वतःचीच हाय-टेक विमाने बॉम्बने उडवली, अमेरिकेनं असं का केलं? 'त्या' रात्रीचा थरार व्हायरल VIDEO

ODI Record: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अजब रेकॉर्ड! शून्य धावा, शून्य विकेट्स; तरीही तो ठरला 'मॅन ऑफ द मॅच'!

SCROLL FOR NEXT