Illegal Parking | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: ठिकठिकाणी वाढते बेशिस्त पार्किंग

Goa News: कुळे-शिगाव ग्रामसभा : पावसाळ्यात दूधसागर ट्रेकिंगसंदर्भात चर्चा

दैनिक गोमन्तक

Goa News: कुळे बाजारात मिळेल त्या ठिकाणी बशिस्त पार्किंग करीत असल्याने लोकांना पुष्कळ त्रास सहन करावा लागत आहे. या भागात दूधसागर धबधबा पाहण्यासाठी पर्यटक घेऊन येणाऱ्या गाड्या मिळेल त्या ठिकाणी पार्क करतात. अशा गाड्यांवर कारवाई करण्यासाठी पंचायतीने पावले उचलावीत, असा सूर कुळे-शिगाव पंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी लावला.

कुळे-शिगाव पंचायतीची रविवार, 6 रोजी झालेली ग्रामसभा सरपंच गोविंद शिगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली. ग्रामसभेत दूधसागर ट्रेकिंगसंदर्भात बरीच चर्चा झाली. यावेळी उपसरपंच नेहा मडकईकर, पंच साईश नाईक, बेनी आजावेदो, प्रसाद गावकर व सदानंद बांदेकर उपस्थित होते.

पावसाळ्यात दूधसागर धबधबा पाहण्यासाठी पुष्कळ असे देशी पर्यटक कुळे गावात येत असतात. स्थानिक लोक ट्रेकिंगसाठी त्यांना घेऊन जातात. पण कुळे-शिगाव पंचायतीला याविषयी काहीही आर्थिक उत्पन्न नसल्याने पंचायतीने पावसाळ्यात लाईफ जॅकेट्‌स येणाऱ्या पर्यटकांना वितरित करावी.

जेणेकरून पंचायतीला उत्पन्नही मिळेल व पावसाळ्यातील ट्रेकींग व्यवसायही सुरळीत चालेल, असे ग्रामस्थांनी सांगितले. तेव्हा सरपंच शिगावकर यांनी आपण संबंधित वन खात्यात याविषयी पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.

शिगाव ते धाटफार्म रस्ता डांबरीकरण करावा. तत्पूर्वी पावसाळ्यात रस्त्याची दुर्दशा झाली आहे त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणीही ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली. या वेळी वेगवेगळ्या समिती निवडण्यात आल्या. सचिव सुषमा कवळेकर यांनी मागील ग्रामसभेचा वृतांत वाचून दाखविला. सरपंच शिगावकर यांनी स्वागत केले.

पे-पार्किंगद्वारे मिळणारे उत्पन्न किती?

पे-पार्किंगद्वारे पंचायतीला किती उत्पन्न (महसूल) मिळते, असे ग्रामस्थांनी विचारले तेव्हा पंचायतीमध्ये एक पे-पार्किंग रजिस्टर आहे. उर्वरित सर्व पे-पार्किंग रजिस्टर नाहीत. तेव्हा याची दखल घेऊन सर्वांकडून कर वसूल करावा, असेही ग्रामस्थांनी सांगितले. तेव्हा याचा योग्य विचार करणार असल्याचे सरपंच शिगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

SCROLL FOR NEXT