पणजी: कला अकादमी गोवातर्फे आयोजित ५१व्या राज्यस्तरीय कोकणी नाट्यस्पर्धेचा (२०२६-२७) निकाल नुकताच जाहीर झाला असून, भांगराळे गोय अस्मिताय (मडगाव) या संस्थेच्या ‘ला मिराज’ नाटकाने सर्वोत्कृष्ट नाटकाचा प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली आहे
नटरंग क्रिएशन्स (नार्वे) यांच्या ‘फेरल’ नाटकाने द्वितीय, तर युवा एकवट (भोमा-फोंडा) प्रस्तुत ‘अर्दकुटें कवन’ या नाटकाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. उत्तेजनार्थ गटात ‘जनशक्ती’ असोसिएशनच्या (कुर्टी-फोंडा) ‘प्रेमजागोर’ व श्री सातेरी ब्राह्मणी संस्थेच्या (माळोली-सत्तरी) ‘रूप-अपरूप’ या नाटकांना पारितोषिक जाहीर झाले आहे. दिग्दर्शन विभागात ‘ला मिराज’साठी डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी प्रथम, ‘फेरल’साठी नितीन नाईक यांनी द्वितीय, ‘अर्दकुटें कवन’साठी वैभव कवळेकरनी तृतीय क्रमांक पटकावला.
वैयक्तिक अभिनयासाठी (पुरुष)- प्रथम- केदार सावंत (जॉर्ज- ला मिराज), द्वितीय- गजानन झर्मेकर (दत्तराज- रूप-अपरूप). महिला अभिनय गटात ‘ला मिराज’मधील प्रभावी भूमिकेसाठी मानसी केरकर यांना प्रथम, तर ‘फेरल’मधील अभिनयासाठी वैभवी नार्वेकर यांना द्वितीय बक्षीस मिळाले. पुरुष अभिनय गटात- शिरीष कळंगुटकर, सलील नाईक, सौरभ कारखानीस, मेघराज आकारकर, संगम चोडणकर, ओंकार गावडे, गोपाळकृष्ण केरकर व रितेश यांना गुणवत्ता प्रमाणपत्रे जाहीर झाली. महिला गटात- रंजिता गावडे, रेश्मा संदीप नाईक, अर्पिता गावस, वेदा देसाई, आरती माटणेकर, तस्लीमा मयेकर, साची जल्मी व बालकलाकार स्वरा गावडे यांनी प्रमाणपत्रे मिळवली.
लेखन आणि तांत्रिक विभागातील विजेते
नाट्यलेखन - युगांक नायक (प्रथम), वैभव कळंगुटकर (द्वितीय). अनुवादित संहिता : वैभव कवळेकर. रंगमंच मांडणी : देवराज माजिक आणि आदर्श गोवेकर. वेशभूषा : ऐश्वर्या कुर्पासकर व गौरी गावकर. प्रकाश योजना : साहिल बांदोडकर; प्रमाणपत्र : उमेश कारबोटकर. रंगभूषा : सारंग मळेकर; प्रमाणपत्र : एकनाथ नाईक. पार्श्वसंगीत : प्रथमेश उसपकर; प्रमाणपत्र : प्रीतेश कुर्टीकर.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.